Home बुलडाणा पत्रकारीता सोबतच करोनो सावटात देवदुताची भुमीका…..

पत्रकारीता सोबतच करोनो सावटात देवदुताची भुमीका…..

242

दोन पत्रकार आले आजीबाईचा मदतीला धावुन…..

देवानंद खिरकर

पत्रकार हा समजाचा आरसा आहे , करोनो या जागतिक संकटात प्रशासनाच्या हातात हात घालून जनजागृती करीत आहे.अशा संकटात बाहेर काम करतांना परीवाराचा जीवात जीव नसतो.परंतु केवळ पत्रकारीता नव्हे तर प्रत्यक्षात करोनोच्या भितिचे सावट असतांना कोणी कोणालाही हात लावत नाही.अशातच मदतीसाठी वणवण फीरत रड्त असलेल्या एका वयोवृध्द आजीबाईला धिर देत तिला वीच्यारपुस करुन सुखरुप तिला गावी जाण्या करीता मदत करणारे अकोट येथिल लोकमतचे विजय शिंदे,व पुण्यनगरी,विदर्भ न्यूज़चे सारंग कराळे व चंदू दुबे हे आज खर्या अर्थाने देवदुत ठरले आहेत.त्या आजीबाईला सारंग कराळे व विजय शिंदे या दोघांंनी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला.परंतु त्या आजीबाईने रड्त रड्त मला पैशे नाही पाहिजे दोनदिवसा पासुन मी उपाशी तापाशी आहे ईथच झोपली,मला माझ्या गावाला जायाला गाडी नाही.मला माझ्या खापरवाडी वरुळ जऊळका या गावी जायचे आहे.मला माझ्या गावी जायचे आहे .मला माझ्या गावला पोहचुन द्या अशी विणवनी केली.असताच विजय शिंदे,सारंग कराळे,चंदू दुबे,या तिघांंनी एका आटो मधे आजीबाईला बसवून दिले व तिला तिच्या घरी सुखरुप पोहचवले.जाती,धर्म,पंथ,भेदभाव विसरुन माणूसकीचे काम करणारे अकोट येथिल पत्रकार विजय शिंदे,सारंग कराळे,चंदू दुबे हे वेळोवेळी संकटात मदतीला धावून जाण्यास तत्पर असल्याचे बोलल्या जात आहे.