Home बुलडाणा शेगावात महिला पोलिसांची आत्महत्या

शेगावात महिला पोलिसांची आत्महत्या

276

अमीन शाह

बुलडाणा ,

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रेम प्रकरणातून या युवतीने हे पावले उचलल्या असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल कु. मंजू वानखडे वय 25 यांनी शनिवारी दुपारपर्यंत कर्तव्य बजावले त्यानंतर अनेक शिवाजी चौक मधील आपल्या कोर्टरकडे ती निघून गेली. दरम्यान संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान आपल्या कोर्टर मधील भिंतीला असलेल्या लोखंडी कडीला दोर बांधून त्याद्वारे गळफास घेतला. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा आढावा घेतला. यामध्ये सदर महिला कर्मचारी आणि एका पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते व शनिवारी त्या प्रेमवीराने लग्नासाठी नकार दिल्याने मंजू वानखडे हिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.