मुंबई

कोरोनाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद, वाचा सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

Advertisements

राजेश भांगे

मुंबई , दि. १५ :- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. सध्याचे रुग्ण, संशयित रुग्ण आणि कोरोनाच्या चाचण्यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. तसेच इतर अनेक मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-
-कोरोनाचा मृत्यूदर सध्या कमी आहे, मात्र संसर्गदर जास्त आहे.
-कुणीही घाबरुन जाऊ नका, काळजी घ्यावी.
-महाराष्ट्रात कोरोनाचे ३३ रुग्ण, कुणाचीही प्रकृत गंभीर नाही.
-१८ बाहेरुन संसर्ग होऊन आलेले आहेत, तर १४ जणांना त्यांच्यापासून संसर्ग झाला आहे.
-केंद्र तसेच राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्रयोगशाळांमध्येच कोरोनाची चाचणी करावी.
-सध्या कोरोनाचे ७५ रुग्ण संशयित आहेत.
-सात देशांमधून परतणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
-रुग्ण पळून जाऊ नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
-जे रुग्ण विलगीकरण मान्य करणार नाही, त्यांना स्थानबद्ध केलं जाणार.
-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार.
-कोरोनाची नियमावली न पाळणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार.
-रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सेवा देण्याचा प्रयत्न.
-मुंबईच्या सेव्हन हिल्स भागात १ हजार बेडची व्यवस्था करणार.
-कस्तुरबा गांधी रुग्णालयात १४५ बेडची व्यवस्था करणार.
-मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबादमध्ये कोरोना तपासणी लॅब सुरु करणार.
-गर्दी वाढू नये यासाठी जमावबंदीचे आदेश.

You may also like

मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांना डेमोक्रॅटिक आरपीआय व सम्यक पँथर चा औकातीत राहण्याचा इशारा.

मुंबई ,  (प्रतिनिधी) – बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांनी आपल्या ...
मुंबई

महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही – पँथर ऑफ सम्यक योद्धाचा इशारा

मुंबई , (प्रतिनिधी) – कोणत्याही राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता तसेच महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली ...
मुंबई

सक्ती व बेशिस्त कर्जवसुली थांबवा अन्यथा हातपाय तोडू – पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई – कोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी सक्त बेशिस्त दमनकारी कर्जवसुली थांबवावी अन्यथा ...
मुंबई

गोर बंजारा वेशभूषेत मुंबई येथील बहूमजली कारपोरेट कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न – उदघाटक, गोर पारूबाई जधव

मुंबई –  बंजारा हृदय सम्राट, उद्योगपती, गोर किशनभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून प्रथमच ठाणे मुंबई येथील ...
मुंबई

यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून जातीय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात – पँथर डॉ राजन माकणीकर

लाखो सह्यांसह मा. राष्ट्रपती यांना शिस्तमंडळ भेटणार मुंबई , (प्रतिनिधी) – भारतात आरएसएस प्रणित भाजप ...
मुंबई

मनीषा वाल्मिकी च्या नराधमांना चौकात फाशी द्या अन्यथा उत्तर मुंबईत रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करणार – सुरेश वाघमारे

मुंबई  – उत्तर प्रदेश येथील हातरस येथील वाल्मिकी समाजातील 18 वर्षीय मनीषा वाल्मिकी या मुलीची ...