Home नागपूर करोना मुळे संत्रा उत्पादकांना येणार सुगीचे दिवस ,

करोना मुळे संत्रा उत्पादकांना येणार सुगीचे दिवस ,

149
0

अमीन शाह

करोनाचे थैमान सर्व क्षेत्राला घायकुतीस आणणारे ठरल्याचे चित्र एकीकडे असतानाच संत्रा उत्पादकांची मात्र करोनामुळे ‘दिवाळी’ झाली आहे. देशांतर्गत आणि आखाती देशात चढ्या भावाने संत्र्याचा पुरवठा होत असून, व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे खाण्याचा वैद्यकीय सल्ला संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवत आहे.
सध्या दुबईला चार जहाजांमधून संत्री पोहोचली असून, पाचवे जहाज सध्या समुद्रात आहे. कतार व ओमान येथे तांत्रिक प्रक्रियेअभावी संत्री पोहोचलेली नाहीत. बांगलादेशात रोज शंभर ते दीडशे ट्रक संत्री पोहोचत आहेत. मुंबईत चढ्या दराने संत्री विकली जात आहेत. ही मागणी पूर्ण करताना संत्रा व्यापार्‍यांना दम लागत असल्याचे ‘महाऑरेंज’चे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत अपेक्षित पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. मृगबहार या वर्षी चांगला आला असून, मागणीतील सातत्यामुळे शेतकरी सुखावल्याचे त्यांनी सांगितले. कृषिमालाची देशाबाहेर बाजारपेठ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी असणार्‍या ‘अपेडा’ या केंद्रीय संस्थेने विदेशात पुरवठा होण्यासाठी केलेले प्रयत्न या वर्षी फळास आले. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांनी सी व्हिटॅमिनयुक्त फळे साथीच्या रोगात चांगली असल्याचे मत व्यक्त केले. संत्र्यांमुळे प्रतिकारक्षमता वाढते. मात्र करोना हा नवीनच विषाणू असल्याने त्यासंदर्भात अशी फळे कितपत उपयुक्त आहेत, यावर ठाम भाष्य करता येणार नाही. मात्र ते नुकसानदायी निश्चितच नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Unlimited Reseller Hosting