Home बुलडाणा आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार

आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार

23
0

आरोपीस अटक

अमीन शाह

बुलडाणा – चिखली तालुक्यातील अंमडापुर येथे एका 45 वर्षीय वयक्तीने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून घडलेल्या घटने मूळे खळबळ उडाली आहे

या प्रकरणी पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार चिखली तालुक्यातील अमडापुर येथे एक अल्पवयीन मुलगी आपल्या आई सोबत शेतात कामाला गेली होती या वेळी येथे असलेल्या गजानन मोरे याने अल्पवयीन मुलीस पाईप उचलायला लाग तुला पैसे देतो असे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ही घटना 7 तारखेची आहे त्या नंतर पिडीत मुलीस त्रास होऊ लागल्याने आई ने विचारना केली असता त्या चिमुकलीने आपल्या आईस घडलेला प्रकार सांगितला पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारी वरून पोलिसांनी आज दुपारी आरोपी गजानन मोरे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहे घडलेल्या घटने मुळे संताप वयकत केला जात आहे .