
रावेर (शरीफ शेख)
जळगाव – मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी जळगाव कार्यालय बाहेर नागरिकत्व सुधारित कायद्याला विरोध व एन पी आर चा बायकॉट म्हणून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा ६८ वा दिवस या दिवशी इस्लाम धर्माचे हजरत अली यांचा जन्मदिवस व होळीचे दहन दोघे पर्व एकत्र आल्याने आंदोलनस्थळी मुस्लिम मंच चे समन्वयक फारुक शेख यांनी प्रथमता माननीय पंतप्रधान व माननीय गृहमंत्री यांच्या साठी प्राथना केली की ईश्वर आपल्या मनातील सारी नकारात्मक शक्ती, मुस्लिम समाजाबद्दल असलेला अनुस्तह, नष्ट होऊन आपल्या जीवनात सकारात्मक शक्ती, आनंद, प्रेम, उत्साह तसेच मुस्लिम समाजास सबका साथ,सबका विकस व सबका विश्वास प्रमाणे निसर्गातील सर्व रंग भरून देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून हजरत आली च्या जीवन चरित्रावर आम्ही चालत राहो अशी प्रार्थना करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
इदगाह ट्रस्टचे अनीस शाह यांनी पवित्र कुराण पठण केले तर दुवा शरीफ बापू यांनी केली.
आंदोलकांना अल्ताफ शेख फिरोज मुलतानी ,मुफ़्ती हारून नदवी, सुलताना शेख युनूस, कविवर्य रागीब ब्यावली,क़य्यूम असर ,कदीर सर व शरीफ शाह यांनी मार्गदर्शन केले.
*विशेष उपस्थिती*
धरणे मधे यांचा होता सक्रिय सहभाग मोनिसा फातेमा, शबीना हरीश, जुबेदा सय्यद चाँद, सुलताना शेख , शबनम शेख युनूस, नजमा हुसेन ,सकिना शेख इस्माईल, अमिनाबी शेख, हसीना बी शेख मुसा , शबनूर बी शेख, साबेरा बी सय्यद नूर, निलोफर शेख असलम, फरजाना शेख युनूस, यासह जिल्हा परिषदेचे माजी कार्यासन अधिकारी शेख हसन, अँग्लो उर्दू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मोहम्मद सगीर, न्यायालय निवृत्त अधिकारी अब्दुल रउफ शेख, वरणगाव चे रहमतुल्ला उस्मान, सय्यद हसन कास्मी ,उर्दू पत्रकार रशिद कास्मी, आसिफ देशपांडे, शेख रहीम मन्यार, अन्वर सिकलिगर ,अजिज सिकलिगर, खलील टेलर यांची उपस्थिती होती.
*उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन*
शनिवार व सोमवार चे दोन निवेदन वेगवेगळ्या दोन शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी यांना दिले
अमिना शेख यांच्या नेतृत्वात शबीना सय्यद, नजमा शेख, रुबीना शेख, रुबीना सय्यद, मोहसिन सय्यद, सुलताना बी यांनी तर शकील बागवान यांच्या नेतृत्वात वसीम शेख ,मोहम्मद साहेब, जुबेर पठाण ,मोहम्मद आरिफ, मोसिन खाटीक, आसिफ खाटीक, वसीम खाटीक, वाजिद अली, शेख शफीक, अन्वर सिकलिगर व अजिज सीकलीकर यांनी दिले.