Home मराठवाडा आधुनीक व धकाधकीच्या काळात महिला सबलीकरण होने ही काळाची गरज – प्राचार्या...

आधुनीक व धकाधकीच्या काळात महिला सबलीकरण होने ही काळाची गरज – प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर

47
0

सययद नजाकत – बदनापूर

जालना , दि. ९ :- आधुनीक व धकाधकीच्या काळात महिला सबलीकरण होने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर यांनी केले त्या येथील कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे महिला सबलीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.

महिला दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महिला सबलीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सौ. एम. डी. पाथ्रीकर या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा संचालक डॉ. एस. एस. शेख, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. एन. जी. खान, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल हजारे, उपप्राचार्य डॉ. झेड. ए. पठाण हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर म्हणाल्या की, स्त्रीयांची प्रगती व अधोगतीवरच संपूर्ण राष्ट्राची प्रगती अवंलबून असते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थींनीना विविध क्षेत्रात प्रवेश करण्याचे आवाहन केले. सद्य स्थितीत मुलींनी अभ्यास करून विविध क्षेत्रे पादाक्रांत करून स्वावलंबी बनले तर आपोआप राष्ट्राची प्रगती होईल असे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना डॉ. राहुल हजारे यांनीही महिला सबलीकरण व सामाजिक स्थिती यावर विवेचन केले. प्रास्ताविक करताना अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. गणेश गावंडे यांनी उपस्थितीत विद्यार्थींनीना स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन करून त्यासाठी विशेष तासीका घेऊन साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्राचार्या डॉ. पाथ्रीकर यांच्या हस्ते ज्या विद्यार्थ्यांनीनी परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना र्स्प्धा परीक्षेचे त्रैमासिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर सिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. यशवंत हाके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. मोहन जोशी, डॉ. रामदास निहाल, डॉ. भरत मिमरोट, डॉ. देवेंद्र देशमुख, डॉ. अशोक मुंडे, डॉ. जीवनज्योती निकाळजे, डॉ. सलमा के. शेख आदींनी परिश्रम घेतले यावेळी अर्थशासत्र विभागाच्या विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.