Home बुलडाणा खामगाव तालुक्यातील माकता येथे घडला खुनी थरार

खामगाव तालुक्यातील माकता येथे घडला खुनी थरार

37
0

माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या…!!

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०९ :- खामगाव तालुक्यातील माकता या गावी एका शुल्लक कारणावरून येथील माजी उपसरपंच चा निर्घृण खून करण्यात आला असून या मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे , या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील माकता येथील रहिवासी राजेश नामदेव कळसकर 32 हे आपल्या घरा समोर उभे असतांना एकनाथ साबे , निवृत्ती साबे , ज्ञानदेव साबे , यांनी गुप्ती , तलवार , लोखंडी रॉड , ने राजेश वर हल्ला चढविला यात ते गंभीर जखमी झाले होते .

त्यांना उपचारार्थ सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते आज दुपारी त्यांची प्राण ज्योत मालवली मृतक राजेश क्लस्कर हे माजी उपसरपंच होते गुप्ती तलवार ने भोसकल्याच्या अनेक खुणा त्यांच्या शरीरावर आहे पोलिसांनी या प्रकरणी 302 , 507, 307 , 34 , अनु , जाती , जमाती कायद्या नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहे ट्रेकटर चा धक्का मृतक च्या मोटर सायकल ला लागल्या वरून हे हत्याकांड घडल्याची चर्चा गावात लोक करीत आहे.

Unlimited Reseller Hosting