Home विदर्भ वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला

114
0

गहू , हरभरा , तूर व हळद पिकाला फटका

फळबाग चे ही नुकसान…!!

मुख्तार सागर

वाशिम , दि. ०९ :- सोमवारी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, तूर, हरभरा व फळबाग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. रविवारी दुपारनंतर ढगाळी वातावरण असल्यामुळे हरभरा, गहू, तूर व फळबाग उत्पादक शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले
होते. सोमवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आला. या पावसामुळे गहू , हरभरा , तूर व फळबाग पिकाचे नुकसान झाले आहे.