Home मराठवाडा अरे नाही टाकलं आम्ही तुमच नावं, यापुढेही टाकणार नाही, कॉंग्रेसचा शिवसेनेला इशारा

अरे नाही टाकलं आम्ही तुमच नावं, यापुढेही टाकणार नाही, कॉंग्रेसचा शिवसेनेला इशारा

98

नांदेड , दि.९ : ( राजेश भांगे ) –
कार्यक्रम पत्रिके मध्ये नाव न टाकल्याच्या कारणास्तव महाविकास आघाडी सरकारमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अजित कार्यक्रम पत्रिकेवर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांचे नाव न टाकल्याने जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार यांच्यासह जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
नांदेड उत्तर मतदारसंघात हा कार्यक्रम ठेवण्यात आला पण तेथील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील उपस्थित नव्हते. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना आमदार अमर राजुरकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडी सरकार आमचे, जिल्हा परिषद आमचीच कार्यक्रम पत्रिकेवर नाव नसल्याच्या कारणा वरुन धुसपूस करायची, अरे नाही टाकलं आम्ही तुमच नावं, यापुढेही टाकणार नाही… काय करायचं ते करा,’ असे म्हणत राजूरकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील ‘जशास तसे उतरा, मी आहे, काही होत नाही ‘ असे म्हणत आमदार राजूरकर यांची पाठराखण केली.
दरम्यान, पालकमंत्री चव्हाण आणि खासदार हेमंत पाटील यांची पूर्वीपासूनची छुप्या युतीबाबत संपूर्ण राज्याला माहिती आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून छुप्या युतीला राजरोस मित्रत्वाचा अधिकृत दर्जा मिळाला आहे. त्यातच कार्यक्रम पत्रिकेतील नावावरुन पालकमंत्री चव्हाण यांनी आमदार राजुरकर यांची पाठराखण केल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.