Home विदर्भ तीन वर्षीय चिमुकली वर बलात्कार करणाऱ्यास अटक

तीन वर्षीय चिमुकली वर बलात्कार करणाऱ्यास अटक

106

अमीन शाह

पुसद – ग्रामीण पो स्टे अंतर्गत चीचपाड येथील १८ वर्षीय नराधमाने घराशेजारील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना काल उघडकीस आली आहे. यातील आरोपीला कालच पोलिसांनी अटक केली.
मन सुन्न करणारी ही घटना ४ मार्च रोजी घडल .होती तर पीडित मुलीचे आजोबा यांनी पुसद ग्रामिण पोलिस स्टेशन ६मार्च रोजी नोंदविली. तीन वर्षीय बालिका आपल्या घराचे अंगणात खेळत असताना शेजारील संदीप रोहिदास चव्हाण वय १८वर्ष या नराधमाने पीडित बालिकेस आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. पिडीताचे आजोबा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे.पुसद ग्रामीण मध्ये भा.द. वि. ३७६, (अ) (ब), बाललैंगिक अत्याचार कलम ४,६,१२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य व पीडितच्या वयाला पाहता तिला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली.
पुसद ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार संजय चोबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस फौजदार गोपालचावडीकर हे पुढील तपास करीत आहेत. बीट जमादार संतोष भोरगे, रवींद्र जगताप, सुनील मदने, प्रसन्नजीत भवरे हे तपासकामी मदत करीत आहेत. दरम्यान पिडीताचे आजोबांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संदीप चव्हाण यास अटक करण्यात येऊन न्यायालयापुढे नेण्यात आल्याचे समजते.