Home सोलापुर सामाजिक कामासाठी धडपडणारा युवक

सामाजिक कामासाठी धडपडणारा युवक

71
0

सतीश मनगुळे

अक्कलकोट शहरात मोलाली गल्ली येथे राहणारा युवक रशिद गुलाब खिस्तके हा गेल्या आठ ते दहा वर्षांपासुन कोणत्याना कोणत्या कामात सक्रियअसून रशिद खिस्तके
हा रॉबिंहुड आर्मी संस्थेचा अध्यक्ष आहे.रशीद हा सामाजिक कामाची प्रेरणा घेऊन सोलापूर येथिल प्र.हिंदुराव गोरे व प्रा.अनिकेत चनशेट्टी यांचंकडून घेत आहेत .आपण समाजासाठी काही देणे लागते याच भावनेने आपणही समाजासाठी काहीतरी करून दाखवावे हाच प्रामाणिक हेतू घेऊन कार्य करत असतात रॉबिन हूड आर्मी मार्फत गोरगरीब व गरजू लोकांना अन्नदान माणुसकी फाऊंडेशन यांच्या वतीने थंडीच्या दिवसात गोर गरीब,वृध्द माणूस व्यक्तींना चादरी वाटप उन्हाळयात पाण्याची टंचाईच्या काळात स्वखर्चाने घरातील पाणी वाटप -आतापर्यंत करून अंदाजे सामाजिक कार्यासाठी 48000/- इतके लाईट बिल भरले मनोरुग्णांना उपचार करणे व त्यांना त्यांना घरी पाठवणे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करतात. आतापर्यंत सात ते आठ वेळा रक्तदान केले .

कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांना रॉबिन हूड संस्थेद्वारे अन्नदान वाटप केले त्याचे विशेष योगदान या कार्यामुळे त्यांना समाधान मिळते.अशा या युवकमित्र रशिद खिस्तके यांच्या कार्याला सलाम! व अनेक शुभेच्छा.