Home महत्वाची बातमी मराठा क्रांती मोर्चाने महा.वि.आ.सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध करीत, केला फसविल्याचा आरोप

मराठा क्रांती मोर्चाने महा.वि.आ.सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध करीत, केला फसविल्याचा आरोप

67
0

राजेश भांगे

महाराष्ट्राचा बहुचर्चित अर्थसंकल्प आज मांडण्यात आला.हा महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प होता.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने या अर्थसंकल्पाचा निषेध केला आहे. औरंगाबाद येथे त्यांनी निषेध केला आहे.राज्यातील ठाकरे सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने यावेळी केला.
मराठा समजाच्या मागणीचा विचार सरकारने केला नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.शिवस्मारक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी सारख्या योजनांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न करण्यात आलेली नाही.सरकारने फसवणूक केली,असे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.