Home जळगाव पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी बाबत व्‍यापा-यांसोबत बैठक संपन्‍न…!!

पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी बाबत व्‍यापा-यांसोबत बैठक संपन्‍न…!!

227

निखिल मोर

पाचोरा – पाचोरा नगरपरिषदेने दिनांक 06/03/2020 रोजी स्‍व.राजीव गांधी टाऊन हॉल येथे “प्‍लॅस्‍टीक मुक्‍त पाचोरा शहर अभियानाअंतर्गत” शहरातील सिंगल युज प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या विक्री करणा-या दुकानदारांची बैठक आयोजीत करण्‍यात आलेली होती.
व्‍यापा-यांमध्‍ये अन्‍न धान्‍य पॅकींग तसेच इतर दैनंदीन वापराच्‍या वस्‍तूचे पॅकिंग या संदर्भात असलेला संभ्रम दुर करुन व्‍यापा-यांनी केवळ व्‍यापार न करता सामाजीक भावनेतून सर्व प्रकारच्‍या प्‍लॅस्‍टीकवर बहिष्‍कार टाकण्‍यासाठी नगरपरिषदेच्‍या खांद्याला खांदा लावून काम करावे असे आवाहन बैठकीत करण्‍यात आले.
यावेळी प्रभारी नगराध्‍यक्ष शरद पाटे, बांधकाम सभापती सतिष चेडे, नगरसेवक वाल्मिक पाटील, मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, प्र.अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्‍य निरीक्षक धनराज पाटील, भांडार विभागाचे ललित सोनार, राजेश कंडारे, महेंद्र गायकवाड, गणेश अहिरे, बापुराव जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते. तसेच व्‍यापारी बांधवांमधून नि‍किती टेक्‍सटाईल, अग्रवाल ड्रेसेस, वाघ डेअरी, सुशिल डेअरी, आनंद प्‍लॅस्‍टीक, जैन टेन्‍ट हाऊस, मिलन फ्रुट तसेच शहरातील भाजीपाला / फळे व्‍यापारी, पत्रकार बंधू व सामाजीक संघटनेचे पदाधिकारी, नागरीक असे सुमारे 200 नागरीक उपस्थित होते.

सर्वांनी एकमताने शहरातून प्‍लॅस्‍टीक हद्दपार करण्‍याची प्रतिज्ञा यावेळी करण्‍यात आली व नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदीची मोहीम यापुढे अधीक तिव्र व निवयमीत स्‍वरुपाची होईल यापुढे रस्‍त्‍यावर सिंगल युज प्‍लॅस्‍टीक कॅरीबॅग नागरीकांकडे देखील आढळल्‍यास दंडात्‍मक कारवाई होऊन गुन्‍हे दाखल करण्‍यात येतील असे मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी सांगीतले.