Home बुलडाणा अंढेरा येथिल दिपाली सानप बनली एक दिवसासाठी वैद्यकीय अधिकारी

अंढेरा येथिल दिपाली सानप बनली एक दिवसासाठी वैद्यकीय अधिकारी

52
0

देऊळगाव मही – रवि आण्णा जाधव

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सगळीकडे महिला सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर. शारदा मांटे . यांनी मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे यासाठी. ओंनढेशवर इंग्लिश स्कूल मध्ये सातव्या वर्गात शिक्षण घेत असलेली दिपाली उद्धव सानप हिच्याकडे. सांकेतिक स्वरूपात. वैद्यकीय अधिकारी पदाचा एका दिवसासाठी पदभार सोपवला. सांकेतिक पदभार स्वीकारल्यानंतर कोरोना व्हायरस हा चीनमधून आला याची लागण होऊ नये म्हणून आपण नेहमी तोंडाला मास किंवा रुमाल बांधला पाहिजे. शिंकताना नेहमी रुमालाचा वापर केला पाहिजे शक्यतेवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे जेवणाआधी नेहमी हात स्वच्छ धुवावे शक्यतोवर कोणासोबत हातात हात देणे टाळावे. दिल्यास साबणाने हात धुऊन काढावे . . . . असे यावेळी वैद्यकीय अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकारी दिपाली सानप यांनी रुग्णांना सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी दिपाली सानप यांच्याकडे ग्रामपंचायत च्या वतीने निवेदन देण्यात आले. कावीळाचया तपासणीच्या सर्व सुविधा. प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा येथे उपलब्ध करून .देण्यात याव्या असे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनावर. रमेश पवार ग्रामपंचायत सदस्य. बद्री मुंडे गणेश सानप. अनंता ताठे. सुशील इंगळे. संतोष राऊत. यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या होत्या. वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार देत असताना. प्राथमिक आरोग्य केंद्राचे. डॉक्टर शारदा मांटे. राजेश शिंगणे. जयश्री इंगळे. स्वाती शिरसाठ. अरुण राजपूत. हे कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील मुलींचे मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम असून जास्तीत जास्त मुलींनी उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी धैर्याने अभ्यास करून जास्तीत जास्त. मोठमोठे अधिकारी होण्याचा प्रयत्न करावा. यातून नवीन पिढी चे उज्ज्वल भविष्य घडू शकेल. डॉक्टर शारदा मांटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा.

Unlimited Reseller Hosting