Home महत्वाची बातमी सावकार ग्रस्त शेतकर्यांना मुक्ती द्या, महाराष्ट्र शेतकरी समितीने राज्यमंत्री बच्चूकडु यांचेकडे केली...

सावकार ग्रस्त शेतकर्यांना मुक्ती द्या, महाराष्ट्र शेतकरी समितीने राज्यमंत्री बच्चूकडु यांचेकडे केली मागणी..!

55
0

देवानंद खिरकर – अकोट

अकोला , दि. ०५ :- सावकार ग्रस्त महाराष्ट्र शेतकरी समितीच्या वतीने राज्यमंत्री बच्चूकडु यांना मागण्या संदर्भात दि.4/3/2020 रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे.निवेदना मधे अवैध सावकारांनि शेतकर्याच्या हडपलेल्या जमिनीचा 7/12 शेतकर्याच्या नावे करुन जमिनी परत कराव्या,सरकारने शेतकर्याच्या पाठीशी उभे राहून शेतकर्यांना सरकारी वकीलाची मदत पुरवावी,कायद्याची कालमर्यादा वाढवावी,ज्या शेतकर्यांना कर्ज मुक्तता प्रमाणपत्र दिले त्या शेतकर्यांना जमिनिचा प्रत्यक्ष ताबा द्यावा,पिक नुकसानीचे अनुदान सावकाराला न देता ते अनुदान सावकार ग्रस्त शेतकर्यांना द्यावे,आदी मागण्याचे निवेदन राज्यमंत्री बच्चूकडु यांना देण्यात आले आहे.सदर निवेदन धरणे आंदोलन हे संस्थापक अध्यक्ष अरुण जाधव,विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील खिरकर,सुनिता ताथोड़ महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.या आंदोलनाला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्री बच्चूकडु यांनी सावकार ग्रस्त शेतकर्याच्या धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी अकोला यांना फ़ोनद्वारे माहिती देवून दि. 9/3/2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सकाळी 11 वाजता सर्व सावकार ग्रस्त शेतकर्याची मिटींग ठेवली आहे.