Home जळगाव जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न आमदार चंद्रकांत पाटील यांच्या...

जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन….!

121

प्रतिनिधी लियाकत शाह

जळगाव , दि. ०२ :- जळगाव जिल्लायात येथील बोदवड शहरातील जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मुमताजबी बागवान हे होते. कार्यक्रमात शाळेच्या अनेक विद्यार्थीनीनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यात अनेक विद्यार्थिनींनी नृत्य, देशभक्ती गीत व नाट्य सादर केले. त्यात वर्ग शिक्षिका शाह नजमा बी यांची इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनी ‘लब पे आती है दुवा बनके तम्मना मेरी’ कौतूस्पद होते यात विद्यार्थीनी प्रत्येक ओढीला नाट्य रुपांतर सुध्दा करत होते. हे सर्व पाहून सर्व प्रेक्षकानी टाळया वाजून विद्यार्थीनच्या प्रोत्साहन केले व इयत्ता दुसरीची शिक्षिका शाह नजमा बी यांना २०००/- रुपये चे प्रोत्साहन म्हणून बक्षीस ही दिले. तसेच विद्यार्थिना या सांस्कृतिक कार्यक्रमला ही खूप बक्षीस ही मिळाले. स्वच्छ भारत वरती नाटकची ही स्तुती करण्यात आली होती. शाह मजर यांनी चांगले गायन केले व पालकाना तळायचे वर्षाव केले. या कार्यक्रमला उपस्थित डॉ. कलाम फाऊंडेशन, जननायक फाऊंडेशन, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्गां कडून सहभागी विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शाळेत उदभवणार्या समस्यां एका महिन्यात सोडणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाषणात सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळेच्या कर्मचारी मुख्याध्यापक मो.इकबाल, शाळेच्या शिक्षक व समन्वयक सादिक अहेमद, पदवीधर शिक्षक न्यामतुल्ला, आसिफ खान, आताउर्ररहेमान, जावेद शाह, मजहर शाह, जैनुलआबेदीन. तसेच शाळेतील शिक्षिका कर्मचारी शाह नजमा बी, मीदहत फुरकान, इफत फातेम या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचा परिश्रम घेतले. व सदर कार्यक्रमचा सूत्रसंचालन शिक्षक जैनुलआबेदीन यांनी केले व कार्यक्रमसाठी शाळा वेव्स्थापन समिती चे अध्यक्ष बशीर भाई, तसेच पालक समिती, सर्व पालकाचा ही योगदान दिले.