
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
राष्ट्रीय लहुशक्तीने दिले नगराध्यक्षाना निवेदन.
वर्धा – सिंदी रेल्वे येथे विशेष नीधी अंतर्गत वार्ड क्रमांक १२ मध्ये नुकतेच बालोद्यानाची निर्मीती सुरु असुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शंभरावी जयंती वर्षानिमित्त या उद्यानाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याची मागणी राष्ट्रीय लहूशक्ती शाखा सिंदीच्या वतीने नगराध्यक्षा संगीता शेंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली
वॉर्ड क्र. 12 मधील बालो उद्यानला “साहित्य भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” यांचे नाव देण्याच्या मागणीचे निवेदन देताना राष्ट्रीय लहूशक्ती संघटनेचे सेलू तालुका अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, गजानन खंडाळे, अशोक कळणे, नारायण वानखेडे, नारायण कळणे, अशोक खंडाळे, भगवान खंडाळे,संग्राम कळणे, गंगाधर गायकवाड, अजय पोटफोडे, गणेश बावणे, नागेश बावणे, सचिन खंडाळे,मनोज कळणे, शुभम पोटफोडे, मयूर पोटफोडे,शुभम खंडाळे, आनंद डफ, अतुल कांबळे आदीची प्रमुख उपस्थीती होती.