Home मराठवाडा कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत...

कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

533
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद :- कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
अदालत रोडवरील क्रांतीनगर सिग्नलवर शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी नितीन रतन दाभाडे (वय ३० रा. बनेवाडी) यानं तक्रार दाखल केली. दाभाडे याने क्रांतीनगर सिग्नलवर पानटपरी टाकून त्याच्यावर निळा झेंडा लावला होता. जाधव यांनी ही पानटपरी काढण्यास सांगितली होती. पानटपरी न काढल्यास ठार मारण्याची धमकी दिली व जातीवाचक शिवीगाळ केली, असं दाभाडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दाभाडे याच्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत या प्रकरणी तपास करीत आहे.
हर्षवर्धन यांचा खुलासा ‘मी शिवसेनेविरोधात राजकीय भूमिका घेतल्यानं माझ्याविरोधात ही कटकारस्थानं केली जात आहेत. मात्र, मला तुरुंगात टाकलं तरी शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवतच राहणार,’ असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

Previous articleवार्ड क्रमांक बारा मधील पालिकेच्या बालोद्यानाला लोकशाहीर साठेचे नाव देण्याची मागणी.!
Next articleउर्दु गर्ल्स हाय स्कूल रावेर येथे स्नेह सम्मेलन , पारितोषिक समारंभ व निरोप समारंभ उत्साहात साजरा
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here