Home उत्तर महाराष्ट्र पाच चिमुकल्या मुलींचे लैंगिक छळ करणारा मुख्याध्यापक आखेर निलंबित….!

पाच चिमुकल्या मुलींचे लैंगिक छळ करणारा मुख्याध्यापक आखेर निलंबित….!

160

संतापजनक घटना…!!

अमीन शाह

जळगाव , दि. ०१ :- तालुक्यातील धामणगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक ???? या नराधमाने ५ चिमुकल्या विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पिडीत मुलींच्या पालकांसह गावकरयांनी त्या नराधमास चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिक्षण विभागाकडून या बाबत जाब-जबाब घेतला असून बिडीओंकडे याबाबत अहवाल पाठविण्यात आला असता त्या मुख्याध्यापकास निलंबीत करण्यात आले आहे.
गुरूशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघड झाल्याने या घटनेबाबत गावासह जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढत असून त्यातच एका मुख्याध्यापकाकडून आपल्या विद्यार्थीनींवर असा प्रकार झाला असून याबाबत त्या मुख्यध्यापकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
गेल्या दिवसांपूर्वी शाळेतील त्या ५ मुलींनी शिक्षण विभागाच्या पथकाकडे तोंडी तक्रार केली होती. गेल्या पंधरा दिवसापासून नराधम मुख्याध्यापक या चिमुकल्या मुलींचा लैंगिक छळ करीत होता. याबाबत एका धाडसी मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतरच हा प्रकार समोर आला. याबाबत पालकांनी मुख्याध्यापक यांना याबाबत जाब विचारला असता त्याला चांगलाच चोप दिला. एवढेच नव्हे तर त्या नराधम मुख्याध्यापकाची पत्नी सुध्दा एक शिक्षीका आहे. तीने गावात येवून जमावाला सांगितले की, माझा नवरा असे करणार नाही. तिच्या समोर त्या मुलींना उभे केले असता तिलाही याबाबत विश्वास आला.
या नराधम मुख्याध्यापकावर शिक्षक विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र ही शिक्षा फारशी नसून त्याला कायमचेच बडतरफ करावे, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. या नराधम मुख्याध्यापका विरूध्द ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.