Home बुलडाणा व्यसनमुक्त समाज निर्माण करणार ना.डॉ. राजेंद्रजी शिंगणे

व्यसनमुक्त समाज निर्माण करणार ना.डॉ. राजेंद्रजी शिंगणे

344
0

दे. महित ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व रियाजखान पठाण यांचा नागरी सत्कार

रवींद्र जाधव – देऊळगावराजा

देऊळगाव मही येथे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी व्यसनमुक्त समाज निर्माण करणार व गुटखा मुक्त समाज हे माझे स्वप्न आहे त्यासाठी गुटका राज्यातून हद्दपार करायचा आहे त्यासाठी स्वर्गवासी आर आर पाटील यांनी गृहमंत्री असताना ‘तंटामुक्त समिती’ या धर्तीवर गुटखा मुक्त अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी मी प्रयत्नशील आहे तरुणांनी व्यसनमुक्त झाले पाहिजे व्यसनमुक्त झाले तर कोणत्याच रोगाची लागण होणार नाही असे मत येथे २२ फेब्रुवारी रोजी ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे व सभापती रियाजखान पठाण यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी सांगितले की मागील चार पंचवार्षिक कालावधीत मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रमाणिक प्रयत्न मी विविध विकास कामांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेला आहे. सिंचन , शिक्षण ,आरोग्य, वीज, प्रशासकीय इमारती यासह सर्वसामान्य घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी मी तत्परतेने काम केले. व यापुढेही करत राहणार आहे. जे सहकारी पक्ष सोडून गेले त्यांना आता पक्षात प्रवेश देणार नाही व येणाऱ्या दोन वर्षात कोणतीही सार्वजनिक विकासाचे काम राहणार नाही याची खात्री ना.डॉ शिंगणे यांनी दिली. दोन वर्षाचा सार्वजनिक कामाचा प्लॅन माझ्याकडे तयार असल्याचेही त्याने जाहीर केले. आज खऱ्या अर्थाने माझी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्री पदी तर भूमिपुत्र रियाज खान पठाण यांची जिल्ह्याच्या अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्यामुळे देऊळगाव मही वासियांनी नागरी सत्कार केला असें ना डॉ शिंगणे यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी प्रमुख उपस्थिती मध्ये सौ रजनी राजेंद्र शिंगणे, जि प सदस्य राजू इंगळे ,राम जाधव, पंचायत समितीचे सभापती रेणुका बुरकुल ,,माजी सभापती कल्याणी शिंगणे ,प्राध्यापक दिलीप झोटे, दादाराव खार्डे ,राजू शिरसाठ ,महेश देशमुख, गजानन पवार ,वा द वानखेडे, माजी सभापती भिकाजी शिंगणे, राजुशेठ डुंगरवाल, गजानन चेके, सरपंच सुनीता इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना डॉ शिंगणे यांच्या माध्यमातून देऊळगाव मही जिल्हा परिषद सर्कल ला मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी मिळत आहे त्यामुळे देऊळगावमही जिल्हा परिषद सरकारचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू असून आज ना डॉ शिंगणे साहेब व जिल्हा परिषद च्या माध्यमातून ४ कोटी ७२ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडत आहे नागरी सत्काराला उत्तर देताना जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांनी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे यांनी बोलताना सांगितले की डॉ राजेंद्र शिंगणे यांनी गुटखाबंदी चे अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे त्याची सुरुवात आपल्या गावापासून आपल्या घरापासून करून साहेबांना समर्थ साथ देण्याचे आवाहन केलं.
प्रश्न पडले तर.. परिवर्तन घडेल आणि परिवर्तन घडलं तर… विकासाचे मार्ग मोकळे होतील,
साहेब पालकमंत्री, केबीनेट
मंत्री झाले हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे मनोगत सौ किरण भागवान शिंगणे यांनी व्यक्त केले.
गजेंद्र शिंगणे यांनी येथील विविध विकास कामांच्या समस्या सोडविण्यासाठी साहेबांनी निधी द्यावा अशी मागणी केली.
प्रास्ताविक गजेंद्र शिंगणे यांनी यांनी तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे यांनी तर संचालन कवी अजीम नवाज राही यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे, दूध संघाचे अध्यक्ष समाधान शिंगणे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुभाष शिंगणे ,सरपंच सुनीता इंगळे, माजी सरपंच सुभाष शिंगणे, बीएम पठाण , उपसरपंच रामा महस्के, रामदास अंकल, शेख फराद, तेजराव शिंगणे, रामभाऊ गुरुजी, चिंधाजी झिने, सुनील मोरे ,भगवान शिंगणे, अशोक पाबळे, सय्यद सईद, राजू चित्ते, वसुदेव पाटील, मोहम्मद कलीम, रवींद्र इंगळे, तुकाराम महाराज शिंगणे, शेख निसार, शंकर दादा शिंगणे, नंदू राऊत ,वामनराव शिंगणे ,अनंता इंगळे ,युनूस कारगिल ,रफिक भाई ,श्रीकृष्ण शिंगणे ,नामदेव बोंबले, शिवाजी शिंगणे , राजेंद्र शिंगणे, बाळू अप्पा पेटकर, बळीराम शिंगणे, परवेझ पठाण, रेहान पठाण, मिजान पठाण यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.