Home मराठवाडा अन , ती आपल्या पाच लेकरांना सोबत घेऊन गेली प्रियकरा सोबत

अन , ती आपल्या पाच लेकरांना सोबत घेऊन गेली प्रियकरा सोबत

143
0

पतीची पोलिसात तक्रार

अमीन शाह

लातूर , दि. ०१ :- कधी काय होईल हे सांगत येणे कठीण असले तरी रोज ऐकावे ते नवलच अश्या घटना घळत असतात पती पत्नी चा प्रेम हा एक अतूट नातं पवित्र बंधन असतो मात्र काही लोक केवळ मौज मजे साठी हे सर्व विसरून जातात व प्रेमाच्या धुंदीत ते काय करीत आहे याचे भान ही त्यांना राहत नाही लातूर जिल्ह्यात सास्तुर या गावी एक विवाहित महिला पाच लेकरांसह आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याची घटना घडली आहे विवाहितेच्या पतीने आपल्या पळून गेलेल्या बायको ला शोधण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार यललोरी येथील रखमाजी गायकवाड यांचा विवाह 2004 साली सविता सोबत झाला होता हे कुटुंब मोल मजुरी करून आपली उपजीविका भागवित होते अश्यातच त्यांना सहा लेकर झाली , सुखाने संसार सुरू असतांना काही दिवसां पूर्वी मी देव दर्शना साठी तुळजापूर ला जाते असे सांगून सविता आपल्या लेकरांना घेऊन गेली ते बरेच दिवस वापस न आल्यामुळे पती रखमाजी गायकवाड यांनी त्याला संपर्क केला असता तो फोन महादेव सातपुते याने उचलला व तुझी बायको माझ्या सोबत आहे तुला काय करायचे ते कर तू जर मला भेटला तर मी तुला जीवा ने मारून टाकेल अशी धमकी दिली मला माझी बायको व लेकर परत मिळावी यासाठी गायकवाड याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे , सर्वत्र या प्रकरणाची चर्चा केली जात आहे .