
रवी जाधव – देऊळगाव राजा
एमपीएससीची, पियसआय, एसटीआय, एएसोओ पदासाठी काल 28 फेब्रुवारी जाहिरात निघाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 806 रिक्त जागासाठी भरती जाहीर केली आहे. आणि 806 जागांच्या हिशोबाने धनगर समाजाला ३.५% ने 24 जागा मिळणं अपेक्षित असतांना फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. तर मंग आमच्या 22 जागा गेल्या कुठे म्हणून आम्ही राज्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई साहेब यांच्याकडे पत्रकारांच्या माध्यमातून मागणी करतोय कि तुम्ही सुधारित जाहिरात द्या आमच्या ज्या 22 जागा तुम्ही चोरलेल्या आहे त्या जागा आम्हाला सुधारित जाहिरातीत आल्याशिवाय तुम्ही या परीक्षा घेऊ नहेत अशी मागणी मी व धनगर समाजाच्या वतीने आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे करतोय जर तुम्ही सुधारित जाहिरात नाही दिली तर आम्ही धनगर समाज राज्यांमध्ये परीक्षा होऊ देणार नाही आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपालांनी त्यांच्या सहीने केलीली आहे जर हे अध्यक्ष इतकी आपरा तपर जागांच्या मधात करत असतील तर अश्या अध्यक्षांची हकालपट्टी राज्याच्या राज्यपाल साहेबांनी करायला पाहिजे जर या अध्यक्षांनी परत अश्याच पद्धतीचं कृत्य या राज्यांमध्ये चालू केल तर या अध्यक्षाला त्या पदावर्ती राहण्याचा काही अधिकार नाही आणि तसेच वंजारी समाजासाठी एकही जागा निघाली नाही. हा प्रश्न धनगर आणि वंजारी समाजाशी निगडित आहे. धनगर हा एनटीसी तर वंजारी समाज हा एनडिटी प्रवर्गात मोडतो. आयोगाने नेमक्या कोणत्या निकषावर या जागा काढल्या आहेत. जातींना ठरलेल्या आरक्षणाप्रमाणे एमपीयससीने जागा काढाव्यात अशी विंनंती करतो आणि आमच्या धनगर , वंजारी समाजाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही धनगर समाज व वंजारी समाजाचे विध्यार्थी घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा देतो.