Home विदर्भ भूत-पिशाच्च दाखवा व 25 लाख मिळवा .!

भूत-पिशाच्च दाखवा व 25 लाख मिळवा .!

155

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

प्रा. पंकज वंजारे महाराष्ट्र राज्य संघटक अखील भारतीय अनिस युवा शाखा.

वर्धा , दि. २७ :- जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी येथे समाजाला अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्याकरिता देवळी येथील श्री. बी. के समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य अंतर्गत सोनेगाव आबाजी येथे पंचवीस फेबु .रोजी अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांमध्ये अ. भा. अनिस कार्यकर्ते प्रा. पंकज वंजारी यांनी गावकऱ्यांना अंधश्रद्धा बद्दल मार्गदर्शन करताना गंडे, दोरे, ताईत देऊन मंत्र तंत्र द्वारे भूत-पिशाच्च आहे अशी खोटी अफवा लोकांमध्ये पसरून समाजाची कशी फसवणूक करतात हे समजून सांगितले. भूत-पिशाच्च चकवा पकडून द्या आणि 25 लाख मिळवा असे आव्हान अनिस कार्यकर्ते प्रा. वंजारी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले. श्री. बि. के. समाजकार्याचे कार्यकारी प्राचार्य सुर्वे यांनी अंधश्रद्धा होणे ही काळाची गरज आहे, असे सांगताना त्यांनी खरे संत कोणास म्हणावे असा फरक जनतेसमोर निर्भीडपणे बोलून दाखविला. त्यावेळी गावातील सरपंच सौ अनिता मॅडम, क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. कु. आरती तुंबडे मॅडम, प्रा. अंकित गिरमकर सर तसेच प्रा. शमीना सय्यद मॅडम, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाने सूत्रसंचालन स्नेहल नंदागवळी तर आभार आकाश डबले यांनी मानले. तसेच दिक्षांत पाटील, श्याम भजभूजे, अक्षय गणवीर, प्रणय वासेकर, विशाल गायकवाड, शुभम होरे, सागर डगवार, लोचना पाचपोर, लोकेश महाजन, अमोल काकडे, तृप्ती अमृतकर, कपिल जाने, नितीन बडे, सचिन ठाकरे, अमोल काकडे, धिरज नाईक, शिवम घारडे, निलेश दारुंडे , रोहन शेंडे, सतीश बकाले, रवीना येरमे, अभय चौधरी गावातील गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.