Home महत्वाची बातमी गोडाऊन ला आग लागून लाखो रुपयांचे फर्निचर आगीत भस्म….

गोडाऊन ला आग लागून लाखो रुपयांचे फर्निचर आगीत भस्म….

30
0

प्रा.तनज़ीम हुसैन

बुलडाणा , दि. २७ :- चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या पद्मालय इमारतीला अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .

https://youtu.be/lmSFPzcUZVg

याबाबत सविस्तर वृत्त असे की , दि 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश व्दाराजवळ असलेल्या प्रल्हाद सहाय शर्मा यांच्या पद्मालय या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या फर्निचरच्या गाळयाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे फर्निचर आग लागून भस्म झाले .

यामध्ये फ्रिज , कुलर , सोफासेट , टीपॉय व इतर लाकडी फर्निचर जळून खाक झाले . या आगीची माहिती मिळताच नगरपालीकेचे अग्नीशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले . अग्नीशमन दल व परिसरातील नागरिकांना शर्तीचे प्रयत्नं करुन आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला .

वृत्तं लिहीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही . आगीचे नेमके कारण कळू शकले नाही मात्र सदर आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Unlimited Reseller Hosting