Home जळगाव वजन काट्याच्या बॅटरी चा स्फोट 4 जखमी , “परिसरात खळबळ”

वजन काट्याच्या बॅटरी चा स्फोट 4 जखमी , “परिसरात खळबळ”

65
0

अमीन शाह / शरीफ शेख

भुसावळ – यावल येथील एका भंगार दुकानातील इलेक्ट्रॉनिक तोल काट्याच्या विद्युत बॅटरीचा अचानक स्फोट होवुन त्यात चार मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना आज २६ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यातील सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
शहरातील आठवडे बाजार परिसरातील मटन मार्केट र्शजारी असलेल्या भंगारच्या मोठ्या दुकानातील भंगार मोजण्याच्या इलक्ट्रॉनिक वजनी तोल काट्यामधील असलेल्या बॅटरीचा आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्या ठिकाणी भंगारचे ट्रक भरण्यासाठी काम करीत असलेले मजुर नाजीमोदीन शेख सलीम (वय २७), राजू बराती खाटीक (वय ३८), नासीर खान हाफीज खान (वय २४) आणि मोहसीन अकबर खाटीक (वय २३) सर्व रा. यावल हे जखमी झाले. त्या इलेक्ट्रॉनिक वजनी तोलकाट्याचा अचानक स्फोट झाल्याने, तोलकाट्यावरील लोखंडी पाटी ही १२ ते १५ फुट उंचीवर उडाली होती. स्फोटामुळे संपुर्ण परिसरात प्रचंड धमाक्याचा ५०० मिटरपर्यंत आवाज झाला. यामुळे नागरीकांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. जखमींना तत्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एल. पवार यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. रुग्णालयात घटनेचे वृत कळताच, जखमींना पाहण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.