साहित्य जगत

मराठीची लिपी म्हणून, बोली म्हणून असलेली वैशिष्ट्यं सांगणारी ‘आमुची लिपी’ ही कविता आज पाहू या. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी ती लिहिली आहे.

Advertisements

लिपी आमुची नागरी
स्पष्ट उच्चारांचे वर्ण
महाराष्ट्रीयां लाभली
वाणी तैसी ही संपूर्ण।।१।।

नसे उच्चारांची व्याधी
नसे लेखनात अढी
जात धोपट मार्गाने
स्वर-व्यंजनांची जोडी।।२।।

अहो, हिची जोडाक्षरे
तोड नाही त्यांना कुठे
उच्चारातली प्रचीती
जशी ओठांवरी उठे!।।३।।

जैसे लिहू तैसे वाचू
जैसे बोलू तैशा खुणा
जे जे लेखी तेच मुखी
ऐसा मराठीचा बाणा।।४।।

सर्व उच्चारांचे शोधा
शास्त्रज्ञांनो, यंत्र एक
तेच दिसेल तुम्हाला
महाराष्ट्रीयांचे मुख!।।५।।

नाद-ध्वनी उच्चारांना
देत सदा आवाहन
लिपी ऐसी ही प्रभावी
माझ्या भाषेचे वाहन।।६।।

You may also like

साहित्य जगत

युगपुरुष स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांच्या १४ मे जयंती निमित्त शंभु-लेख …

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया स्वराज्य संकल्पक…शहाजीराजे, स्वराज्य मार्गदर्शक…राजमाता जिजाऊ, स्वfराज्य संस्थापक… छत्रपती शिवराय, त्याच बरोबर शिर्के ...
साहित्य जगत

उर्दू आणि पंजाबी साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

अमीन शाह महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष आणि ...
साहित्य जगत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विशेष लेख…..

इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे ...