Home जळगाव संदिप मधूसूदन पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

संदिप मधूसूदन पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

67
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाळी दिगर येथील उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना नेहरू युवा केंद्र भारत सरकार संलग्न,मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन,जळगाव चा राज्यस्तरीय “भारतरत्न मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९-२०” नियोजन भवन जळगाव येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.यावेळी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम.देवांग,ग.स.पतपेढी जळगाव चे अध्यक्ष मनोज पाटील,मराठी पत्रकार संघाचे प्रवीण सपकाळे,क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील,मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख,चेतन निंबोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

संदिप पाटील यांनी या अगोदर अमळनेर तालुक्यात ढेकू खुर्द,जळगाव तालुक्यात बिलवाडी या गावांमध्ये सेवा केली असून पढाई पे चर्चा,शाळा आपल्या दारी,दप्तरमुक्त शनिवार,स्वच्छता सन्मान असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.पुरस्काराबद्दल संदिप पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,पदाधिकारी,शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.