Home रायगड कर्जत तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयात गैरसोय….!!

कर्जत तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयात गैरसोय….!!

85
0

आमदार महेंद्र थोरवेनी दिले थेट महसूल मंत्र्यांना निवेदन….!!!

कर्जत – जयेश जाधव

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दोन दुय्यम निबंधक सबरजिस्टर कार्यालय आहेत मात्र या कार्यालयात दस्त नोंदणी होतीलच याची काही गॅरंटी नसते.तेथे अनेकदा नेट नसल्याचे समोर येत असल्याने अनेकदा तासनतास तेथे प्रतिक्षेत राहावे लागते.त्यामुळे यांची दखल कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली असून थेट महसूल मंत्र्यांना याबाबत निवेदन दिले असून लवकरच ही गैरसोय दूर होणार असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत आणि नेरळ या दोन्ही शहरांत दुय्यम निबंधक सबरजिस्टर नोंदणी कार्यालये आहेत. येथे दररोज विविध दस्त नोंदणी करण्यासाठी या दोन्ही कार्यालयात प्रचंड गर्दी असते.मात्र या शासकीय कार्यालयात बीएसएनएल या कंपनीचे नेटवर्क असल्याचे दिसून येते.परिणामी दस्त नोंदणी करण्यासाठी येणाऱ्यांना तासनतास तेथे थांबावे लागत आहे.काहीवेळा तर संध्याकाळ होते तरीही अनेकदा दस्त नोंदणी न करताच घरी जावे लागते.त्यामुळे जनतेला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क दोन-दोन महिने गायब होत असल्याने तेथे नागरिकांची गैरसोय होत असून येथे शासनाचाही महसूल बुडत असल्याचे महसुलमंत्र्यांना आमदार थोरवे यांनी सांगितले आहे.

तसेच बीएसएनएलचे अभियंते यांचे बरोबर आमदारांनी वेळोवेळी संपर्क साधूनही बीएसएनएलकडुन कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने आणि कर्जतचे बिल्डर,नागरिक आणि वकिलांच्या तक्रारी वाढल्याने कर्जतच्या या दोन निबंधक कार्यालयासाठी बीएसएनएल मार्फत व्ही-सॅट अथवा खाजगी कंपनीकडून लिज लाईनन नेटचा पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी कर्जतचे आमदार थोरवे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.त्यामुळे आता महसूल मंत्री काय निर्णय घेऊन याबाबत आदेश देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.