Home विदर्भ तांबाडी जि. प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न….!!

तांबाडी जि. प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न….!!

280

कोरपना – मनोज गोरे

कोरपना बीटाअंतर्गत जि. प. प्राथ. शाळा तांबाडी येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन जि.प.सदस्या मा. सौ विनाताई सुरेश मालेकर यांनी केले. तर अध्यक्षस्थानी सरपंच मा. सौ सुवर्णाताई विनोद वासेकर ह्या होत्या.

याप्रसंगी मा. श्री संतोषभाऊ बावणे अध्यक्ष (शा. व्य. स.) केंद्रप्रमुख मा.श्री.संजय त्रिपतीवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कु. वैशाली नवरे ग्रामविकास प्रवर्तक,मा. श्री. धनराज कुळसंगे पो.पा.तांबाडी शा.व्य. समिती सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती म्हणून श्री मोहनराव गेडाम गुरुजी (सेवानिवृत्त आदर्श शिक्षक तांबाडी) यांचा त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ फोटो देऊन सत्कार केला.गुरुशिष्य कृतज्ञता सोहळ्याने सर्वजन भारावले.
सव्वीस पटसंख्या असलेली छोटीशी तांबाडी जि.प. शाळेने सांस्कृतिक महोत्सवात बळीराजाची व्यथा (नाटक) वैयक्तिक नृत्य, गीत गायन, दैवत छत्रपती नृत्य, काँमेडी नक्कल, गुणवत्तेवर आधारित समूह नृत्य,शालेय मुलांचे भाषण , बडबड गीते, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित राष्ट्रभक्तीचा संदेश मूल्यवर्धन मूकनाट्य यासारखे 30 दर्जेदार प्रकार सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. उपक्रमशील शाळा तांबाडीची प्रगतीकडे वाटचाल बघून क्रीडा संमेलनातील यश व दर्जेदार शिक्षण इ.बाबीची दखल घेत गावकऱ्यांनी माझी शाळा…माझा अभिमान या उपक्रमाने प्रेरित होऊन लोकसहभागातून शाळा विकासासाठी सुमारे एक लक्ष ₹ लोकवर्गणी व वस्तुरुपात शाळेला भेट दिली.
तांबाडी शाळेचे मु.अ.श्री बालाजी म्हेत्रे व स.शि.श्री बालाजी नरवटे या बालाजी जोडीने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे जि.प.सदस्या,सरपंच,केंद्रप्रमुख , शा.व्य.स.व सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेतील उत्कृष्ट सेव्हन स्टार आँफ तांबाडी विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सदर सांस्कृतिक महोत्सवात गत दोन वर्षापासून जि.प. शाळेत सुरू असलेल्या सहशालेय उपक्रमांचे व विविध कृतीचे प्रोजेक्टर द्वारे स्क्रीनवर प्रक्षेपण करून संपूर्ण गावकऱ्यांना दाखवण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बालाजी एम.म्हेत्रे व संचालन स.शि.श्री बालाजी जी. नरवटे यांनी केले; तर आभारप्रदर्शन शिक्षणप्रेमी श्री सिद्धार्थ खाडे यांनी केले.
तांबाडी जि. प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कोरपना बीटाअंतर्गत जि. प. प्राथ. शाळा तांबाडी येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन जि.प.सदस्या मा. सौ विनाताई सुरेश मालेकर यांनी केले. तर अध्यक्षस्थानी सरपंच मा. सौ सुवर्णाताई विनोद वासेकर ह्या होत्या. याप्रसंगी मा. श्री संतोषभाऊ बावणे अध्यक्ष (शा. व्य. स.) केंद्रप्रमुख मा.श्री.संजय त्रिपतीवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कु. वैशाली नवरे ग्रामविकास प्रवर्तक,मा. श्री. धनराज कुळसंगे पो.पा.तांबाडी शा.व्य. समिती सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .