Home जळगाव धरणे आंदोलनाचा५८ वा दिवस यूनानी डॉक्टरांचा सक्रिय सहभाग

धरणे आंदोलनाचा५८ वा दिवस यूनानी डॉक्टरांचा सक्रिय सहभाग

192

नवदांपत्य युसुफ व फरहीन नाज चा सहभाग

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा बुधवार ५८ वा दिवस होता या दिवशी युनानी डॉक्टर असोसिएशन जळगाव सक्रिय सहभाग नोंदवून आपला निषेध नोंदविला.
*नवदांपत्य मोहम्मद युसुफ व फरहीन नाज चा आंदोलनास सक्रिय पाठिंबा*

मुस्लिम मंच उपोषण व धरणे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून एमआयडीसी परिसरातील पोलीस कॉलनी मधील व्यायाम पटू मोहम्मद युसुफ हे दररोज आंदोलनात सहभागी होत आहे २५ फेब्रुवारी रोजी त्यांचे लग्न भुसावळ येथे सामूहिक विवाहात संपन्न झाले व आज २६ फेब्रुवारी रोजी ते आपली पत्नी फरहीन नाज हिला घेऊन धरणे आंदोलनात सहभागी झाले मंच समन्वयक फारुक शेख यांनी त्या नवदांपत्याचे स्वागत केले तसेच त्यांचे आभारही व्यक्त केले. यावेळी मंच चे कय्यूम असर,अल्ताफ शेख, अल्ताफ मन्यार, रज्जाक शेख, हामिद शेख, सलीम मणियार, हाफिज शाहीद, करीम सालार, डॉक्टर अमानुल्ला शाह, डॉक्टर फारुक शेख, डॉक्टर अल्तमश, डॉक्टर देशमुख आदींची उपस्थिती होती.

*धरणे आंदोलनाला सुरुवात*

अल्ताफ शेख यांच्या कुरआन पठणाने आंदोलनाची सुरुवात झाली तर समारोप हमीद शेख यांच्या दुवा ने करण्यात आला यावेळी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर अल्तमस शेख, डॉक्टर अश्पाक काकर, डॉक्टर जावेद शाह, डॉक्टर आफाक सालार, डॉक्टर अनिस शहा, डॉक्टर अमानुल्ला शाह ,डॉ करीम सालार हमीद शेख, फारुक शेख ,शरीफ शाह बापू ,अमीन बादलीवाला व युसूफ खान अयुब खान यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉक्टर एजाज शहा, डॉक्टरनी अनीस शाह, डॉक्टर नदीम नजर, डॉ तौसीफ,डॉ अलीम शेख,डॉक्टर वसीम शाह, डॉक्टर सज्जाद पटेल ,डॉक्टर मोईन फारूकी ,डॉक्टर फारूक मणियार ,डॉ रईस कासार,हाजी मजीद जकेरिया, नगरसेवक रियाज बागवान यांची उपस्थिती होती.

*निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*

डॉक्टर फारुक शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर अल्तमश शेख ,डॉक्टर अश्पाक काकर,डॉ तौसीफ, डॉक्टर आफ़ाक सालार ,डॉक्टर सज्जाद पटेल यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.