Home मराठवाडा महा आघाडि सरकारची ६८ गावांतील १५ हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी...

महा आघाडि सरकारची ६८ गावांतील १५ हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

60
0

नांदेड , दि.२७ – ( राजेश भांगे ) –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ६८ गावांमधील १५ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली.

३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख ६१ हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. आज प्रकाशित झाली यादी त्यामध्ये ६८ गावातील १५ हजार 368 लोकांची नावं आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांचा समावेश आहे.४५०० जणांना आधार प्रमाणपत्र दिलं. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत.
*कोल्हापूर*
कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले आणि हेरले या दोन गावातील नावांची यादी आज प्राथमिक टप्प्यावर जाहीर झाली आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत आसुर्ले इथं हे काम सुरु आहे.
*अहमदनगर*
९७२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ब्राह्मणी (ता. राहुरी) गावातील ८५६, तर जखणगाव (ता. नगर) मधील ११६ शेतकऱ्यांची नावं या यादीत आहेत. नगर जिल्ह्यात २ लाख १५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती आहे.
*उस्मानाबाद*
तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावातील 312 शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी जाहीर केली आहे.
*हिंगोली*
236 शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे. हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या गावांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट दिली.
कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफी यादी जाहीर झाल्यांनतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती आहे.