Home रायगड कर्जत मध्ये गांजा प्रकरणी दोन जण अटक, सुमारे 10 लाखाचा ऐवज जप्त

कर्जत मध्ये गांजा प्रकरणी दोन जण अटक, सुमारे 10 लाखाचा ऐवज जप्त

14
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडे पंधरा किलो गांजा सापडला असून व वाहतूक करणारी गाडी असा सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार कर्जत शहरातून नशाकारक अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग चे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पोमण, पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी, पोलीस हवालदार स्वप्नील येरूणकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत देशमुख यांनी कर्जत – पळसदरी रस्त्यावरील हॉटेल कर्जत किंग रेस्टॉरंट समोरील रोडवर सापळा लावला होता, त्यावेळी या रस्त्यावरून संशयित पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी नंबर एम-एच-46 बी के 1519 ही गाडी जात असताना पोलिसांनी गाडी अडवून गाडीची तपासणी केली असता गाडी मध्ये एक काळ्या रंगाच पोत आढळून आले त्यामध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी गाडीतील दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चौकशी केली त्यापैकी अवदेश चंद्रशेखर वर्मा (वय-31) रा. कर्जत महावीर पेठ, मुन्नीलाल ललकारी राजभर (वय-25) सध्या रा. मुद्रे कर्जत पण मूळचा रा. बेहरी ता. किराकत जिल्हा गाझीपूर राज्य उत्तर प्रदेश मध्ये आहे. यावेळी गाडीमध्ये 1 लाख 86 हजार रुपयांचा 15 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांना सापडला.
याप्रकरणी पोलिसांनी 1 लाख 86 हजार रुपयांचा गांजा व वाहतूक करणारी गाडी किंमत 8 लाख रुपये असा एकूण 9 लाख 86 हजार ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी ही कारवाई दि. 25 फेब्रुवारी रोजी 9 वाजून 15 मिनिटांनी केली.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुरनं 42/2020 एन.डी.पी.एस.अधिनियम,1985 गुंगी कारक औषधद्रव्य आणि मनो व्यापार परिणाम करणारे पदार्थ अधि.1985 चे कलम 8 (ग) व 20 (ख)चे उल्लंघन (2) (ग) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स्था.गु.अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस.पोमण हे करीत आहे. दोन्ही आरोपींना आज दि.26 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 फेब्रुवारी पर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.