Home विदर्भ शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे धरणे आंदोलन

शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे धरणे आंदोलन

91
0

मनोज गोरे

चंद्रपुर , दि. २५ :- जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकयांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ऊराज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत . याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फ २५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे नारायण हिवरकर भाजपाध्यक्ष कोरपना यांच्या अध्यक्षतेखाली राज्य व्यापी आदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले .

महाविकास आघाडी सरकारने शेतकयांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे . शेतकयांची घोर फसवणूक करणाऱ्या व गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे . महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी भाजपचे नारायण हिवरकर,रमेश मालेकर, सतीश उपलेंचवार मनोहर कुरसंगे नथू पाटील ढवस, हरीश घोरे, संजय मुसळे, किशोर बावणे, गंगाधर कुटलवर, भारत चॅने अमोल आसेकर, पुरुषोत्तम भोंगळे, कवडू पाटील जरिले,विज्या लक्ष्मी डोहे,नीलेश ताजने, रामसेवक मोरे अरविंद डोहे, संदीप शेरकि शशिकांत आडकिने, विजय रणदिवे, यशवंत इंगळे,विनोद नवले, नजीर खान हरबाजी झाडे पद्माकर दगडी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपोलिस स्टेशन बिडकीन येथील नुतनीकरण व सुशोभीकरणाच्या उपक्रमांचे पोलिस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटिल यांचे शुभ हस्ते लोकार्पण
Next articleप्रहरची मागणी दोन वर्षांपासून चा तो खड्डा बुजवा…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here