Home विदर्भ प्रहरची मागणी दोन वर्षांपासून चा तो खड्डा बुजवा…!

प्रहरची मागणी दोन वर्षांपासून चा तो खड्डा बुजवा…!

44
0

कोरपना – मनोज गोरे

गडचांदूर कोरपना रोड वरील वडगाव आसन च्या मधात नाल्याचा पूल आहे तिथं ६ ते ७ फुटाचा खडा पडुन जवळपास दोन वर्षे होत आहे पण कोणत्याही लोकप्रतिनिधी वा राजकीय नेत्यांनी लक्ष दिले नाही हा रस्ता राष्टीय महामार्ग असल्याने गडचांदूर येथून अनके सिमेंट भरलेले जड वाहतूक अदिलाबाद वणी यवतमाळ पांढरकवडा या ठिकाणी वाहतूक सुरु असते या जादा वाहतुकीने रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे अशातच अपघाताचे प्रमाण खूप वाढले याच हेतूने प्रहार चे सतिश बिडकर यांनी स्वतः त्या खड्या ची पाहणी केली व उपविभागीय अधिकरी राष्टीय महामार्ग उपविभाग धानोरा मुख्यालय स्थित चंद्रपुर अशोक मत्ते याना फोन वर माहिती देऊन त्या बाबतचे निवेदन देण्यात आले राजुरा गडचांदूर कोरपना ,गोविंदपूर या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरु आहे पण काम खूप संथ गतीने होत आहे त्याला हेरून कामाची गती वाढवणे रस्त्याचे काम जलदगतीने करण्यात यावे व आसन वडगाव या रस्त्याच्या मधात असलेला खडा तात्काळ बुजवून देण्यात यावा अन्यथा प्रहार संघटना खड्यात उतरून आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया प्रहरचे सतिश बिडकर यांनी दिली.