Home बुलडाणा जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

161

नात्याला काळिमा फासणारी घटना…!

अमीन शाह

बुलडाणा , दि. २५ :- दारूचे व्यसन जडले की, नशेत असलेल्या व्यक्तीच्या मनावर नियंत्रण राहत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार करीत असल्याचे भान ही राहत नाही. अशीच नात्याला काळीमा फासणारी घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोस्टे हद्दीतील हिवरा खुर्द येथे उघडकीस आली. आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पिण्याचे पाणी आणण्याचा बहाना करून, घरात एकांततेचा फायदा घेत नराधम वडीलाने तिचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. इतकेच नव्हे तर आपल्या मुलीवर वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करतांना कुणाला सांगितले तर तुझ्या आईला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
अंकुश किसनराव बघे असे त्या नराधमाचे नाव आहे. अंकुशचे स्वत:वरील नियंत्रण सुटले असले तरी समाजमन सुन्न करणारी ही घटना आहे. पिंपळगाव राजा येथून जवळच असलेल्या हिवरा खुर्द येथील अंकुश बघे हा रामटेक मूतीजापूर येथे राहत होता. नातेवाईकांकडे हिवरा खुर्द येथे गेल्या काही दिवसांपासून तो परिवारासह मुक्कामी होता. दरम्यान त्याची पत्नी शेतात कामाला गेली असता घरात असलेल्या १६ वर्षिय मुलीसोबत अनैतिक कृत्य करण्याचा अंकुशने प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार केला असता तिला व तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी त्या आरोपी बापाने दिली.व त्याच्या सोबत अत्याचार केला.

सदर बलिकेला अत्याचार सहन न झाल्याने तिने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली. या फिर्यादी च्या अनुषंगाने ठाणेदार सचिन चव्हाण यांनी तपासाला गती देत आरोपीला हिवरा खुर्द येथून अटक केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी बापावर भा , ड , वि 354 , 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बालिका पारस जिल्हा अकोला येथे एक वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत असताना तेथे सुद्धा या नराधम बापाने अत्याचार केल्याचे तिने आपल्या जवाबात म्हटले आहे. चौकशी च्या आधारे पोलिसांनी अंकुश बघे याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हे करीत आहे.