Home मराठवाडा मुंबई येथून चोरलेल्या ट्रक ची तोडफोड करून स्पेअर पार्ट भांगरात विकणाऱ्या दोघांना...

मुंबई येथून चोरलेल्या ट्रक ची तोडफोड करून स्पेअर पार्ट भांगरात विकणाऱ्या दोघांना अटक…!

25
0

सययद नजाकत

जालना , दि. २६ :- नवी मुंबई येथून चोरुन आणलेल्या हायवा ट्रकचे सुटे भाग भंगारात विकण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला कदिम पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पो.नि. देविदास शेळके हे आपल्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस कर्मचारी के. जी. चव्हाण, जी.डी. जाधव, रमेश काळे, म.पो.कर्मचारी मगरे यांच्यासह पेट्रोलिंग करत असतांना पो.नि. शेळके यांना गोपनीय माहिती मिळाली की, दु:खीनगर भागात एक इसम हायवा ट्रकचे काही पार्टस् तोडफोड करुन भंगारमध्ये विकत आहे. यावरुन सदरील ठिकाणी या पथकाने धाव घेतली असता त्याठिकाणी शफीक पठाण मंसूर पठाण (वय२४ रा. संजयनगर) हा आढळून आला त्यास विचारपुस केली असता त्याने हा ट्रक मुंबईहून चोरुन आणल्याचे कबुल केले. कदिम पोलीसांनी तळोजा (मुंबई) पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चोरलेल्या ट्रकची माहिती दिली.

Unlimited Reseller Hosting