Home महत्वाची बातमी निर्धार सामाजिक संस्था एक हात मदतीचा ,माणुसकीचा हे ब्रिदवाक्य मनाशी बाळगून सामाजिक...

निर्धार सामाजिक संस्था एक हात मदतीचा ,माणुसकीचा हे ब्रिदवाक्य मनाशी बाळगून सामाजिक कार्य कामोठे पनवेल ते सातारा कोल्हापूर पर्यंत पोहचले आहे.

222

गिरीश भोपी

मैत्रीतून सामाजिक कार्याकडे पाऊल ठेऊन सामाजिक कार्यासाठी संस्थेने सामाजिक जाण असलेली युवा पिढीचं तयार केली असून प्रत्येक महिन्याचा सेकंड संडे’ ला कार्यक्रम ठरलेलाच असतो .

रविवार ,23 फेब्रुवारी 2020 रोजी अण्णासाहेब सहस्र्बुद्धे आश्रम शाळा ,वाकडी-पनवेल येथे निर्धार सामाजिक संस्था आणि शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती विशेष ‘एक शिवजयंती अशीही ‘ कार्यक्रमाचे आयोजन करून मुलांना ऐतिहासिक चित्रपट दाखवून विविध खेळांचे आयोजन करून चित्रकला स्पर्धा -निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला…..विशेष म्हणजे 9 वि आणि 10 विच्या विद्यर्थ्यांसाठी ’10 वि नंतर काय ? या विषयावर मार्गदर्शन गणेश सरानी केले .

कार्यक्रमासाठी प्रामुख्याने निर्धार सामाजिक संस्थेचे शिलेदार निलेश आहेर ,शुभम वाळके ,अजित पवार ,मंगेश शिंदे ,
पंकज साळवे ,कमलेश पाटील ,अविनाश पाटील ,मिनाक्षी जांभळकर आणि शिवशंभू प्रतिष्ठान चे शिलेदार अनिल कुंभार,कैलास बागल,गणेश पार्टे,युवराज पाटील,नेहा कुंभार,
यांच्या सहकार्यने कार्यक्रमयशवी रित्या पार पडला .

शेख सर यांनी संस्थेच्या कामाविषयी कौतुक करून शुभम वाळके यांनी कार्यक्रमाची सांगता केली.