Home विदर्भ भाजपा तालुका कोरपन्याच्या वतीने निष्क्रिय शासना विरुद्ध भाजपचा एल्गार व धरणे आंदोलनाचे...

भाजपा तालुका कोरपन्याच्या वतीने निष्क्रिय शासना विरुद्ध भाजपचा एल्गार व धरणे आंदोलनाचे आयोजन

853

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

चंद्रपुर , दि. २२ :- कोरपना तालुक्याच्या वतीने दिनांक 25 : 02 : 2020 मंगळवार ला राज्यव्यापी धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कोरपणा तहसील कार्यालया समोर सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे तरी खालील मागण्या करण्यात येणार आहे.
1) सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची करुण 7/12 कोरा करावा व चालू खातेदार शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी देण्यात यावी.
2) महिला वरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर आळा घालावा.
3) दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करन्यात यावी.
4) सीसीआयची खरेदी मे महिन्याच्या शेवट पर्यंत चालू ठेवन्यात यावी व पैसे त्वरित खात्यात जमा करन्यात यावे.
5) पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती त्वरित देण्यात यावी व त्यांचे बिल त्वरीत खात्यात जमा करण्यात यावे.
6) रेती घाट त्वरित लिलाव करून रेती उपलब्ध करून देण्यात यावी .

7 ) वन्य प्राण्या पासून शेतकऱ्यांना होणार्या त्रासचा बंदोबस्त करण्यात यावा.
8) वर्ग दोनची जमीन एक मध्ये करण्यात यावी.
9) तूर नाफेड मार्फत त्वरित खरेदी करण्यात यावी चार क्विंटल ऐवजी दहा क्विंटल खरेदीची परवानगी द्यावी तसेच कोरपना येथे नाफेड केंद्र सुरू करण्यात यावे.
10) कृषी पंपाचे प्रलंबित विज कवेक्शन त्वरित देण्यात यावे.
11) धडक सिंचन अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे पैसे त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे विविध विषयाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना तहसिलदार साहेब यांच्या मार्फत देण्यात येणार आहे तरी सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.