Home महत्वाची बातमी न्यायमूर्ती एस बी सुक्रे व न्यायमूर्ति माधव जमादार यांची लोणार सरोवर येथे...

न्यायमूर्ती एस बी सुक्रे व न्यायमूर्ति माधव जमादार यांची लोणार सरोवर येथे भेट

805

सरोवराची केली पाहणी….

सचिन गोलेच्छा

लोणार : लोणार सरोवर संवर्धन आणी जतनाची कामे न्यायालयाने दिलेल्या निर्देशा नुसार सुरू आहेत की नाही हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उच्चन्यायालायचे न्यायमूर्ती एस बी सुक्रे व न्यायमूर्ति माधव जमादार यांनी लोणार येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली
या वेळी दोन्ही न्यायमूर्ती नी विरजतीर्थ धार,नीरी प्रकल्प ( नबीचा खडा ) त्या नंतर सरोवर पाहणी, इजेक्ट ब्लेंकेट ची पाहणी केली त्या नंतर तहसील कार्यालच्या सभागृहात बेठक घेण्यात आली या मध्ये सरोवराच्या मध्य भागाच्या पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे परीक्षण करणे या पूर्वी सरोवराच्या बाजूच्याच पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे परीक्षण करण्यात आले होते त्या नंतर पिसाळ बाभूळ काढण्यासाठी हस्त यंत्राचा वापर करावा जेणे करून काम त्वरित काम पूर्ण होईल मोठ्या यंत्राचा उपयोग केल्या जाणार नाही विरजतीर्थ धार येथे येणाऱ्या पर्यटकां साठी स्वछता गृह ( वॉश रूम ) ची त्वरित काम पूर्ण करण्याचे पुरातत्व विभागाला आदेश दिले त्या नंतर जुन्या विश्रामगृहा वर आकाशातील तारे बघण्यासाठी ( दुर्बीण ची ) व्यवस्था करण्याचे बांधकाम विभाग,पर्यटन विभाग व वन्यजीव विभागाला सूचना दिल्या इजेक्ट ब्लेंकेट जतन केलेल्या ठिकाणच्या जागेची पाहणी केली व न्यायालयाच्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारे छेडछाड करू नये असे आदेश वन्यजीव विभागाला दिले, या नंतर स्मशानभूमी चा निधी साठी त्वरित मंजुरात घेण्याचे सांगितले,एम एस आर डी सी ह्यांना नवीन बायपास ( वळण रस्ता ) मेहकर रोड, हिरडव रोड, लोणी रोड, पांग्रा रोड, देऊळगाव कुंडपाळ जवळ लोणार मंठा रोडला जोडणारा रोडमधील येणाऱ्या जमीन त्वरित अधिग्रहण करून काम त्वरित सुरू तसेच करन्याच्या सूचना दिल्या
जेव्हा पासून लोणार सरोवर ला अ वर्ग दर्जा प्राप्त झाला तेव्हा पासून कामे ही धीम्या गतीने सुरू होती परंतु उच्च न्यायालयाच्या निगराणी अंतर्गत कामे सुरू झाली तेव्हा पासून कामाना गती मिळाल्याचे दिसून येते लोणार सरोवर विकासाला चालना मिळाली आणी आता पर्यंत च्या न्यायालयीन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाची न्यायमूर्ती यांनी प्रत्यक्ष स्वहता पाहणी केली असे समजते न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे लोणार चा लवकरच काया पालट होणार असल्याचे दिसून येत आहे
या वेळी बेठकीला न्यायमूर्ती एस बी सुक्रे,आणी न्यायमूर्ती माधव जमादार,जिल्हा न्यायमूर्ती खोंगल,निवासी जिल्हाधिकारी दुबे,उप विभागीय अधिकारी गणेश राठोड,समिती सदस्य प्रा बळीराम मापारी,मा.प्राचार्य सुधाकर बुगदाने,प्रा गजानन खरात,वन्यजीव विभागाचे खेरणार,एम एस आर डी सी चे भराड,पर्यटन विभागाचे वावधने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिखरे,तहसीलदार सेपन नदाफ नगर परिषद मुख्याधिकारी विठल केदारे,वरिष्ठ संरक्षन सहायक लोणार उपमंडल एच पी हुकरे,न.प.अभियंता अजय हाडोळे,तलाठी विजय पोफळे वन्यजीव विभागाचे नपते, सरकटे,आदी उपस्थित होते.