Home मराठवाडा कोरपना मध्ये वांनरापासुन नागरिक त्रस्त.

कोरपना मध्ये वांनरापासुन नागरिक त्रस्त.

30
0

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

चंद्रपुर , दि. २२ :- गेल्या काही वर्षात वन्य प्राणी आणि माणसांमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कधी बिबट्या, कधी वाघ तर कधी रानडुकरांनी मानवी वस्तीत हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरपना मधील बीएसएनएल टाँवर जवळ असलेल्या वस्तीत वानरांनी अक्षरश: उच्छाद घातला आहे. कोरपना वासीय वानरांच्या त्रासाला चांगलेच वैतागले आहेत. काही महिन्यांपासून ग्रामस्थांना वानरांचा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामस्थांनी त्याची तक्रार वनसडी वनपरिक्षेत्र अधिकारी व वनविभागाच्या कोरपना मधील कार्यालयात दिली. त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंतीही केली. पण वनविभागाने त्याची कसलीही दखल घेतली नाही. वनविभागाचे नेमके कर्मचारी करता तरी काय असा सवालही नागरिक करित आहे. वानरांची ही टोळी घरादारात ठेवलेल्या वस्तू,किराणा, अन्नधान्य, कपडे, मोबाईल घेवून वानर पळून जातात. लहान मुलांचे चावे घेतात. एवढंच नाही तर गेल्या दोन वर्षात वानरांच्या भीतीनं गावातील नागरिक छतावरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

वानरांच्या त्रासाबद्दल अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देवूनही त्याची दखल घेतली जात नाही.
असा आरोप कोरपना तील ग्रामस्थ करित आहे.

Unlimited Reseller Hosting