मराठवाडा

नांदेडात असलेल्या दवाखान्यात चालणाऱ्या बोगस स्टाॅफचा काळा बाजार बंद करा..

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे युनायटेड नर्सेस असोशियशन चे अध्यक्ष आदी बनसोडे यांनी केली मागणी.

नांदेड , दि. २२ :- जिल्हाधिकारी स्वतः एम डी शिक्षण घेतलेले असल्यामुळे नांदेड मध्ये असा कारभार चालतो, त्यामुळे अशा दवाखान्यात बोगस स्टाॅफ चा काळा बाजार बंद करा अशी तक्रार ब्रदर आदी बनसोडे यांनी केली असून,यावर आम्ही नक्की अॅक्शन घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे..

नांदेड शहरातील काही मोठमोठ्या हॉस्पिटल आहेत जिथे गोरगरीब रुग्णांची आर्थिक लुट पिळवणूक केली जाते, त्या दवाखान्याची नावे जिल्हाधिकारी नांदेड यांनी लिहुन घेतले आहे, महत्वाचा मुद्दा असा की, ज्यांनी नर्सिंग केले नाही ते दवाखान्यात काम कसे करतात..

नांदेड जिल्ह्यातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफ रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत. त्या दवाखान्याची कार्यवाही करावी..
जिल्हाधिकारी स्वतः डॉक्टर असल्यामुळे नर्सिंग वर अन्याय होऊ देणार नाहीत.. लवकरात लवकर कार्यवाही करतो व आयुक्तांकडे फोनवर चर्चा केली..
नांदेड जिल्ह्यातील खाजगी नर्सेसच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणारा UNA युनायटेड नर्सेस असोशियशन, रुग्ण हक्क परिषद नांदेडचे अध्यक्ष मा.आदी बनसोडे यांच्या कार्यास खाजगी नर्सेसनी जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा द्यावा व खाजगी नर्सेसला काही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आव्हानही त्यांनी केली..

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...