देवानंद खिरकर – अकोट
अकोला / अकोट , दि. २१ :- शहरात
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त काढण्यात आलेली मिरवणुक लक्षवेधक ठरली. मिरवणुकीत असलेली गदीँने शहरातील रस्ते भगवामय केले होते.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अकोटवतीने आयोजित शिवसोहळ्याचे विविध कार्यक्रम पार पडले.
स्थानिक शिवाजी पार्क मधील अश्वमेघ पुतळ्यावर आरूढ शिवरायाचा राज्यभिषेक सोहळा पार पडला.त्यानंतर बस स्टेशन,रेल्वे स्टेशन येथील शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे हार अर्पण आणि पूजन करण्यात आले.पोवाडा शहर दणाणून गेले होते.
मोठे बारगण शिवाजी महाराज नगर येथुन भव्य मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. मिरवणुकीत शिवाजी महाराज यांची मोठी राजेशाही पुतळा ठेवण्यात आली होती. या पुतळ्याचे पुजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी यांनी केले.
तसेच वेशभूषेतील अश्वावर बसलेले
शिवाजीराजे व इतर शिवकालीन मावळे,अश्व व शिवसंदेश ध्वज फडकत होते. मिरवणुकीत शिवरायांची पालखी व भजन दिंडी,भुसावळ चा बँन्ड व अमरावती येथील ढोलपथक व जय भवानी,जय शिवाजी घोषणाने शहर दणाणले होते
शहरात ठिकठिकाणी मिरवणुकीतील शिवराय पुतळ्याचे पुजन ,पुष्पवृष्टी करण्यात आली. विविध स्वंयसेवी,संघटनानी जल व इतर स्टाँल लावण्यात आले होते. शहरात मुस्लिम बांधवांनी सुध्दा जयंती दिनानिमित्त शिवाजी महाराज व मुस्लीम मावळ्यांचा सार्थ अभिमान असल्याचे फलक लावले होते.
या मिरवणुकीचा समारोप शिवाजी पार्क शिवाजी चौक येथे करण्यात आले. मिरवणुकीत शिवप्रेमीसह शहरवासी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. मिरवणुकीतसहभागी झालेल्या शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सतीश हांडे कार्याध्यक्ष गोपाल मोहोड किशोर देठे, चेतन गुरेकर, अजय गवई, सोपान गहले, नितीन गुजरे, निलेश तिवारी, गोपाळ पेढेकर, प्रसन्न जवंजाळ, मुकुंद नागमते, केशव हेंड, रितेश पाचकोर शिवा, पाचपोहे, शशांक कासवे, विठ्ठल वाकोडे राहुल सोनार निवृत्ती गडम, सुमित ठाकूर अचल बेलसरे ऋषी हरने शुभम वॉलशिंगे मयूर महले प्रणय टवले वैभव गुहे या पदाधिकारी परिश्रम घेतले. या शिवसोहळ्यात राजेश नागमते,संजय गोरे,श्रीजित कराळे,प्रभूदास तळोकार, योगेश नाठे,अनंत मिसाळ सागर उकंडे विशाल भगत ,देवानंद डोबाळे, चेतन मर्दाने,मनोज झाडे,अनिरुद्ध देशपांडे करण शिंगणारे,ब्रम्हा पांडे,,विलास बोडखे,मंगेश सूरज शेंडोकार पटके,सागर बोरोडे मुकेश निचळ प्रवीण डिक्कर आदीची प्रमुख उपस्थिती होते. मिरवणूक दरम्यान शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज चव्हाण पोलीस उपनिरीक्षक रणजित सिंह ठाकु यांनी चांगला बदोबस्त ठेवला होता.