Home मराठवाडा एस डी आर एफ दल यांचे देवगिरी दौलताबाद किल्ल्यावर शस्र प्रदर्शन व...

एस डी आर एफ दल यांचे देवगिरी दौलताबाद किल्ल्यावर शस्र प्रदर्शन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

150

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २१ :- आज भारतिय राखीव बटालियन क्र 14 औरंगाबाद
एस डी आर एफ दल यांचे देवगिरी दौलताबाद किल्ल्यावर शस्र प्रदर्शनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मा आर पोलिस महासंचालक रा रा पोबल यांच्या आदेशानुसार श्रीमती अर्चना त्यागी यांच्या संकल्पने तुन किल्ला ट्रेकिंग, शस्र प्रदर्शन, मैत्री अभियान, अप्पति व्यवस्थापन माहिती देणे या कार्यक्रम अंतर्गत देवगिरि दौलताबाद किल्ला येथे शालेय विद्यार्थिना व पर्यटक सहली,पर्यटक यांना पोलिस दलात वपरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक विविध शस्त्रांचे प्रदर्शन करून माहिती देण्यात आली शस्राचे नाव,गोळी, कीती अंतर पर्यन्त मारा केला जातो याची माहिती शस्र माहिती गार शेरसिंह साबले, वसीम पठान,विनोद सुर्वे,सिद्धार्थ ढवले यानी दिली। याच बरोबर एस आर डी एफ चे प्रदर्शनी करण्यत आली यात पुर ,भूकंप, कोणत्याही हजार्ड आय, हाय रिसकु दैनंदिन सराव, व बचाव कार्य,करण्यास हे ,दल सक्षम असते आपदा स्तिथि आल्यास कसे वाचवले जाते याचे प्रात्यक्षिक व त्यासाठी लागणारे साहित्य याची माहिती पोलिस निरीक्षक के यू पवार यानी मुलाना दिली या दलाने सातारा,सांगली, कोल्हापुर, पुरग्रस्त गावात कार्य केले व शिरपुर वाघोडी केमिकल कंपनी मधे ब्लास्ट झाले होते त्यावेळी महत्वाचे कार्य केले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश माटे समादेशक भारत बटालियन यांनी केले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी साठी पोलिस उपाधीक्षक इलीयास शेख,पोलिस निरीक्षक एम एस सपकाल,पोलिस निरीक्षक आर के राउत,पोलिस निरीक्षक एस सी साळवे,पोलिस उपनिरीक्षक पी डी राठौड़ व किल्ल्या चे सहायक संवर्धक संजय रोहनकर,कर्मचारी अशोक निभोरे,फ़कीचन्द गायकवाड़, संजय घुसळे, सीताराम धनाएत,बाबासाहेब आढव,रमेश राठौड़,बविस्कार सर,सूर्यवंशी सर यांची प्रमुख उपस्थिति होती.