Home जळगाव मुख्याध्यापक श्री शेख ऐनोद्दीन सय्यद हसन यांना मौलाना अबुल कलाम आज़ाद लोकमित्र...

मुख्याध्यापक श्री शेख ऐनोद्दीन सय्यद हसन यांना मौलाना अबुल कलाम आज़ाद लोकमित्र सन्मान पुरस्कार प्रदान , “सर्वत्र अभिनंदन”

380

अमीन शाह

जळगाव , दि. २१ :- धरणगांव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक १ धरणगांव तालुका धरणगांव जिल्हा जळगांव शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक श्री शेख ऐनोद्दीन सय्यद हसन यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मालेगांव येथील प्रकाशदायी एज्युकेशन एॅन्ड वेलफेयर सोसायटी मालेगांव जिल्हा नाशिक शाखा कासोदा ता. एरंडोल यांच्या तर्फे नुकतेच मौलाना अबुल कलाम आज़ाद लोकमित्र सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री प्रमोद पाटील चिलाणेकर (रा.मा.सामाजिक न्याय संघटना जळगांव) यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटी जळगांवचे अब्दुल करीम सालार होते. पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मान्यवर म्हणून पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री करण दादा पाटील, जि.प.जळगांवचे माजी उपाध्यक्ष मच्छिन्द्र दादा पाटील, जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे संपादक विवेक देविदास ठाकरे, भारतीय पत्रकार महासंघाच्या एरंडोल तालुका अध्यक्ष तथा संयोजक श्री नुरुद्दीन मुल्लाजी, अब्दुल मजीद झकेरिया, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ. पाकीज़ा उस्मान पटेल, संस्थेचे अध्यक्ष श्री मोईनुद्दीन मुल्लाजी सर, फारूक शाह नोमानी, किशोर पाटील कुंझरकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक श्री निजामुद्दीन हुस्नुद्दीन, अब्दुल मुतल्लिब जनाब, नईम अहमद जनाब, शाहबाज़ खान जनाब अक्रम रज़ा, मोहम्मद अरफात आदींनी त्यांचे स्वागत केले. या वेळी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्तिथी होती ,