Home मुंबई चारकोप मध्ये संत श्री सेवालाल महाराज जयंती साजरी….!!

चारकोप मध्ये संत श्री सेवालाल महाराज जयंती साजरी….!!

210

सुरेन्द्र वाघमारे

मुंबई , दि. १९ :- बंजारा समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत श्री संत सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी संत सेवालाल महाराजांची प्रतिमा असलेला रथ मिलन नाका ते गणेश चौक येथे मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बंजारा समजाच्या महिलांनी एक विशिष्ट पेहराव मध्ये नृत्य सादर केले.

या जयंती उत्सवाची सांगता शुभम गार्डन पार्टी हॉल याठिकाणी करण्यात आली. याप्रसंगी विभागातील नगरसेविका संध्या विपुल दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत सेवालाल सेवालाल महाराज नाका जनसेवा समिती चे अध्यक्ष संजय पवार, राम मोरे,नारायण राठोड, मोतीराम जाधव, रमेश राठोड, मधुकर पवार ,मधुकर खेतावत किशोर जाधव,महिला संघटक इंदुबाई जाधव, लक्ष्मी पवार, जया राठोड, बेस्ट कर्मचारी कुमेश चव्हाण, श्याम राठोड, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वाघमारे यांनी तर कार्यक्रमाची रूपरेषा विकास आढे व सुनील शिंदे यांनी ठरविली व शेवटी आभार प्रदर्शन समिती चे सचिव गजानन चव्हाण यांनी केले.यावेळी शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते