
【 सुरेश सिंगेवार मार्केटिंग एक्सिकेटीव्ह यांच्याकडून 】
नांदेड , दि. १९ :- दि.१८ रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा महा लॉगीन दिवस साजरा करण्यात आला त्या दिवशीनांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. यांचा मान ग्रामीण शाखा डाकपाल महिला मिळाला आहे.
म्हणतातना महिला स्वता:च्या आसितत्वाची जाणीव करून देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्याला खादा लावून काम करीत आहे. त्यासाठी तिच्या आंतरमनातून येणार आत्मविश्वास आणि धाडस हे तिला पाठबळ देते त्याचं प्रमाणे आज आपल्याला पाहायला उदाहरण मिळाले आहे.
डाक अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात चारशे वीस शाखा डाक घरे,एक मुख्य पोस्ट ऑफिस, व एकावन्न उप पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी महा लॉगीन दिवसा निमित्ताने सकाळपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती.
या मोहिमेत सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी खाते उघडण्यासाठी भाग घेतला होता.त्याच प्रमाणात मोठ्या संख्येने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे एकूण बारा हजार, आठशे,बासष्ट खाते उघडण्यात आले जवळपास दिलेल्या संकल्प ९०%७ पूर्ण करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक महालॉगीन दिवशी सर्वात जास्त पोस्ट बँकेचे खाते उघडणारी कलंबर बीओ मुखेड चे ब्रँच पोस्ट मास्तर जान्हवी सुभाष नेंनताबाजे हिने १९३ खाते उघडून नांदेड जिल्ह्यात विक्रम करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पात्र ठरले आहे तर आदिवासी व दुर्मिळ भागातील मु. पो. परोटी बीओ इस्लापुर येथील शाखा डाकपाल रवी वाडीकर यांनी १७५ खाते उघडून विक्रम करून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पात्र ठरले आहे तर तुपा बीओ सिडको येथील शाखा डाकपाल अजय श्रीनिवार यांनी १५३ खाते उघडून विक्रम करून तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पात्र ठरले आहेत असे सांगण्यात आले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखा नांदेडचे प्रबंधक एम. राजेंद्र यांनी पोस्ट बँकेच्या महा लॉगीन दिवशी सर्वात जास्त खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षिसे खालील प्रमाणे ठेवली आहेत.
प्रथम बक्षीस रोख रुपये १००१/रुपये व एक वर्षांसाठी दोन लाखाचा अपघाती विमा.
दुसरे बक्षीस रोख रुपये ५०१/ व दोन लाखाचा एक वर्षांसाठी अपघाती विमा.
तिसरे बक्षीस रोख २५०/व एक वर्षांसाठी दोन लाखाचा अपघाती विमा.
तसेच सुरेश सिंगेवार मार्केटिंग एक्सिकेटीव्ह मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड यांनी सर्वात जास्त खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुपये ५५१/रोख रक्कम बक्षीस म्हणून डाक अधीक्षक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी सर्व नांदेड डाक टीम इंडिया पोस्ट पेमेंट बँक महा लॉगीनच्या दिवशी खूप मेहनतीने कामे केली त्या सर्वाचे अभिनंदन केले आहे.











































