Home सोलापुर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शिवजयंती निमित्त फरसाना जिलेबी वाटप

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शिवजयंती निमित्त फरसाना जिलेबी वाटप

30
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

राष्ट्रिय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे साहेब यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शिवजयंती निमित्त अकलूज येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर वेळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करून फरसाना व जिलेबी वाटप करण्यात आली.
ठाकुरबुवा वेळापूर येथील राजे छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी सुवर्णदुर्ग ते ठाकूरबुवा वेळापूर अशी 320 किलो मीटर पायी ज्योत आणली जाते त्या ज्योतीचे पूजन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,तालुकाध्यक्ष उमेश वाघमारे,तालुका कार्याध्यक्ष अमित जवंजाळ,तालुका उपाध्यक्ष शंकर पवार,अकलूज शहर अध्यक्ष मिलिंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ज्योत आनणाऱ्या कार्यकर्त्यांना फरसाना व जिलेबी वाटप करण्यात आली.
यावेळी तालुका संपर्क प्रमुख अनिल खरे,तालुका युवक कार्याध्यक्ष सचिन कांबळे,अकलूज शहर संघटक राहुल मोरे,शहर कार्याध्यक्ष स्वप्निल शिरसट,शहर उपाध्यक्ष बजरंग वाघमारे,राजे छत्रपती तरुण मंडळाचे सोमनाथ पवार,आनंद पवार,ओंकार चव्हाण,सुरेश कोळेकर,अजित पवार,फिरोज तांबोळी,दादासाहेब साठे,अजय साठे,अमोल साठे,भागवत निंबाळकर,हनुमंत शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.

Unlimited Reseller Hosting