Home जळगाव मुस्लिम मंच च्या ५१ व्या दिवशी आंदोलन सुरूच , “जळगाव शहरातील शायर-...

मुस्लिम मंच च्या ५१ व्या दिवशी आंदोलन सुरूच , “जळगाव शहरातील शायर- कवी चा सक्रीय सहभाग”

165

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून५१ व्या दिवसापासून साखळी उपोषण ऐवजी धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून मंगळवारी जळगाव शहरातील शायर कवी यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या शायरी च्या माध्यमाने या कायद्याचा व कायदा करणारे व त्यासाठी अहंकाराची भाषा करणाऱ्यांविरुद्ध आपल्या शायरी च्या माध्यमाने विरोध नोंदविला.

*राष्ट्र भक्त शायरी व निषेधात्मक शायरी द्वारे कवींचा कायद्यला विरोध*

हाफिज अकील कडगाव यांनी पवित्र कुराण पठण करून उपोषणाला सुरुवात केली.
*राष्ट्रीय शायर चा समावेश*

राष्ट्रीय कवि रागीब ब्यावली, अक्रम कुरेशी, शाहिद जिलानी या सोबत जुनेद मसूद, तरबेज ब्यावली, कासिम उमर ,हाफिज शाहिद,रहमतुल्ला खान, इमरान उमर ,हाफिज मुस्ताक असर, फैजान शेख, अल्लाउद्दीन शेख, फारुख कादरी, रशीद कासमी, अब्दुल हमीद शेख, या कवींनी उत्कृष्ट अशा कविता शायरी सादर करून आपला निषेध नोंदविला.

*यांची होती विशेष उपस्थीती*

यावेळी इंडिया टीव्ही चे नरेंद्र कदम, दलित सामाजिक सेवाभावी संघटनेचे श्याम साळुंखे व अरूण सपकाळे, कॉम्रेड अशोक कोळी, शफी पेंटर, इरफान सालार,अक्रम देशमुख, रउफ खान, जावेद सौदागर( पुणे) फारुक कादरी, आदींची विशेष उपस्थिती होती.

*उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन*

रागिब ब्यावली यांच्या नेतृत्वात शाहिद जिलानी, हाफिज रशीद, अक्रम कुरेशी, कयूम असर, हमीद शेख ,हाफिज शाहिद, अन्वर सिकलिगर, आदींनी दिले.