Home मराठवाडा सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांचे उघडले पोस्ट बँकेचे खाते.

सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांचे उघडले पोस्ट बँकेचे खाते.

281

नांदेड , दि.१८ :- रोजी तरोडारोड येथील पोस्टमन पाटील व डाक विभागाचे डाक साहयक नारे यांनी डाक अधिक्षक लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली आज इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा लॉगीन दिवसा निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील डाक टीम युद्ध पातळीवर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी काम करीत आहे. याच कामाचा भाग म्हणून सकाळी सकाळी आधिकारी, कर्मचारी व नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने स्वच्छ हवा आरोग्य चांगले राहण्यासाठी फेण्या करीता बाहेर दररोज सकाळी उठल्यावर फिरण्यासाठी येत असतात यांचे उघडून देण्यासाठी पोस्टमन पाटील व डाक साहयक नारे यांनी प्रत्येक नागरिकांचे काही मिनिटात खाते उघडून त्यांना डिजिटल Q R कार्ड देऊन त्यांना घर बसल्या बॅंकेचा आर्थिक व्यवहार करता येणार आहे.
या मोहिमेचे नांदेडकरानी मोठ्या मनानी स्वागत केले असल्याची चर्चा सर्व नांदेड जिल्ह्यात होत आहे.